दैनिक स्थैर्य । दि.०१ मे २०२२ । वाई । पिराची वाडी तालुका वाई येथे असले पिराचीवाडी मार्गावर वन विभागाने सापळा रचून बेकायदेशीररित्या लाकूड मालाची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाला ताब्यात घेतली महादेव बलभीम जगताप असे त्या टेम्पो चालकाचे नाव असून त्याच्याकडून साडेसात लाख रुपये किमतीचे रायवळ जातीचा लाकूडफाटा जप्त करण्यात आला.
बेलमाची तालुका कराड येथून वनरक्षक कराड यांच्या तक्रारीनुसार सातारा वनविभाग आला या वाहतुकीची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार सातारा व वाई या वन विभागाच्या संयुक्त पथकाने पिराचीवाडी परिसरात सापळा रचून हा टेम्पो दिनांक 26 रोजी ताब्यात दुपारी तीन वाजता ताब्यात घेतला.
चालक महादेव बलभीम जगताप यांची कसून चौकशी करण्यात आली . वाई तालुका पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे टेम्पोचा झडती मध्ये साडेसात लाख रुपये किमतीचे रायवळ जातीचे लाकूड आढळून आले आहे वन्यजीव संरक्षण कायदा 1941 दोन प्रमाणे जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भामध्ये सश्रम कारावासाची शिक्षा होऊ शकते असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.