क्षेत्र नृसिंहवाडीतील टेंबे स्वामी महाराज आराधना उत्सवास आज साधेपणाने प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कुरुंदवाड, दि. 15 : शिरोळ तालुक्यातील दत्त क्षेत्र नृसिंहवाडी येथे परंपरेप्रमाणे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आराधना उत्सवास अत्यंत साधेपणाने आज प्रारंभ झाला हा आराधना उत्सव 22 जून अखेर साजरा करण्यात येणार असून उत्सव समानार्थी दिवशी होणारा महाप्रसादाचा कार्यक्रम कोरोना च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे अशी माहिती दत्त देव संस्थान चे अध्यक्ष अशोक पुजारी सचिव गोपाळ पुजारी यांनी दिली.

दरम्यान या उत्सव काळात श्री टेंबे स्वामी मठात सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत वेदमूर्ती अवधूत शास्त्री बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहिता परायण अभिषेक रुद्राभिषेक पवमान आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत दुपारी बारा वाजता टेंबे स्वामी मठात महापूजा दुपारी चार ते पाच वेदमूर्ती दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण तर उत्सव काळात दिनांक 15 जून ते 17 जून अखेर सायंकाळी पाच ते सात या वेळेत युवा कीर्तनकार विवेक बुवा गोखले तर 18 जून ते 21 जून अखेर युवा कीर्तनकार शरद बुवा घाग यांची सुश्राव्य कीर्तन होणार आहेत तर दररोज सायंकाळी साडेसात वाजता मठात आरती सोहळा पार पडणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी मोजक्याच सेवेकऱ्यांना सेवेसाठी प्रवेश दिला जात आहे.

या उत्सवात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाच्या नामस्मरणाची परंपरा आहे. यासाठी भक्त निवास क्रमांक दोन मधील वरील बाजूच्या हॉलमध्ये शासनाच्या निर्देशानुसार व सोशल डिस्टन्स इन चा उपयोग करून नामजपाचे आयोजन केले आहे.

तर अखेरच्या दिवशी होणारा महाप्रसाद कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द करण्यात आला असून घरोघरी प्रसादाच्या वाटपाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी विश्वस्त विकास पुजारी प्राचार्य गुंडो श्रीपाद पुजारी रामकृष्ण पुजारी आदी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!