
दैनिक स्थैर्य । 28 मार्च 2025। फलटण । तेजज्ञान फाऊंडेशनला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘तेजज्ञान आपल्या दारी ’ या अभियानातंर्गत गुरुवार दि. 27 मार्च रोजी तेजगुरु सरश्री लिखित ग्रंथांचा व साहित्याचा तेजज्ञान रथाचे आगमन फलटण शहरात झाले आहे.
या रथात उपलब्ध असणार्या विविध विषयांवरील पुस्तकांवर 10 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे.
शुक्रवार दि. 28 मार्च रोजी राम मंदिर येथे सकाळी 8 ते 9.30 व सायंकाळी 8 ते 9. 30 या वेळेत प्रविण ढवळे यांच्याशी तर सकाळी 9.30 ते 1 कामेंद्र गुरव यांच्याशी संपर्क साधावा. शनिवार दि. 29 मार्च रोजी शनिमंदिर मिरगाव येथे सकाळी 8 ते 9.30 व सायंकाळी 8 ते 9. 30 या वेळेत प्रविण ढवळे यांच्याशी तर सकाळी 9.30 ते 1 कामेंद्र गुरव यांच्याशी संपर्क साधावा.
रविवार दि. 30 मार्च रोजी सकाळी राम मंदिर याठिकाणी 10 ते 12 या वेळेत प्रविण ढवळे यांच्याशी तर दुपारी 12 ते सायंकाळी 5 कामेंद्र गुरव यांच्याशी तर सायंकाळीी 6 ते 7 या वेळेत प्रतिभा फडतरे यांच्याशी संपर्क साधावा.
सोमवार दि. 31 मार्च रोजी सकाळी 8 ते 10 रात्री 9 ते 10 या वेळेत प्रविण ढवळे, तर सकाळी 7 ते 8 सुवर्णा विभुते तर सकाळी 10 ते दुपारी 1 कामेंद्र गुरव हे उपलब्ध असणार आहेत. तरी आपल्या सोयीच्या वेळेत तेजज्ञान रथाला भेट देऊन 10 टक्के सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन तेजज्ञान फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.