दैनिक स्थैर्य | दि. १८ सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
तेजसिंह भोसले यांनी सकाळी श्री सद्गुरू हरिबाबा यांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर वडील दिलीपसिंह भोसले, मातोश्री अॅड. सौ. मधुबाला भोसले यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर सुविद्य पत्नी सौ. मृणालिनी भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, मातोश्री अॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी त्यांचे औक्षण केले.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीराम बझारचे मार्गदर्शक संचालक महादेवराव पवार, चेअरमन जितेंद्र पवार, नानासाहेब पवार, मोहिम प्राणायाम क्लबचे सर्व सदस्य, अमोल सस्ते, पत्रकार यशवंत खलाटे, श्रीराम बझारचे संचालक, कर्मचारी, श्री सद्गुरू उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, महाराजा उद्योग समूहाचे पदाधिकारी, सहकार महर्षी हणमंतराव पवार कुक्कुटपालन संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी, स्वयंसिध्दा महिला संस्था समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी, ब्रिलियंट अॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅ. भोसले हेल्थ क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक, सभासद आदींनी त्यांना प्रत्यक्ष, दूरध्वनीवरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
तेजसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला असल्याचे सद्गुरू महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी याप्रसंगी सांगितले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले, सद्गुरू पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राजाराम फणसे, प्रभाकर भोसले, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज गृहतारण संस्थेचे चेअरमन तुषारभाई गांधी, महाराजा मल्टिस्टेटचे व्हा.चेअरमन रणजितसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. स्वयंसिध्दा संस्था समूहाच्या संचालिका सौ. मृणालिनी भोसले, श्री. बाबर साहेब, संचालक सुनील पोरे, सौ. मृणालिनी भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
या कार्यक्रमास सद्गुरू व महाराजा व स्वयंसिध्दा महिला उद्योग समूहाचे पदाधिकारी, कर्मचारी तसेच नेत्रचिकित्सा शिबिरासाठी आलेले लाभार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी केले.