स्थैर्य, फलटण : नूतन तहसीलदार समीर मोहन यादव यांचे स्वागत करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, शेजारी नायब तहसीलदार आर. सी. पाटील व मान्यवर. |
स्थैर्य, फलटण, दि.५: येथील रिक्त तहसिलदार पदावर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार तथा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असलेले समीर मोहन यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आपल्या नवीन पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, महसूल कर्मचारी संघटनेचे उदय काकडे, मनोज काकडे, असिफ तांबोळी, बाळू जाधव वगैरेंनी नूतन तहसीलदार समीर यादव यांचे स्वागत केले.
सन २०१० मध्ये नायब तहसिलदार म्हणून महसूल खात्यात रुजू झालेले समीर मोहन यादव हे मूळचे कडेगांव जि. सांगली येथील रहिवासी असून नायब तहसिलदार म्हणून शिराळा, मावळ, हवेली या तालुक्यात काम केल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये पदोन्नतीने तहसिलदार पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा येथे नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता फलटणच्या रिक्त तहसिलदार पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी आपली ही नवी जबाबदारी स्वीकारली
आहे.
गेल्या काही महिन्यांपासून फलटणचे तहसिलदार पद रिक्त असल्याने या पदाचा
कार्यभार निवासी नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांच्याकडे देण्यात आला होता, आज त्यांनी सदर जबाबदारी तहसीलदार समीर यादव यांच्या कडे सुपूर्द केली आहे.