दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । महाबळेश्वर । महाबळेश्वर तालुक्यामध्ये 10 डिसेंबर 2021 रोजी शिवप्रताप दिन उत्सव साजरा होणार असून त्याउद्देषाने नागरिक एकत्र येण्याची शक्यता असून त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेकामी यावर्षी साजरा करणेत येणार शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पध्दतीने व शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पार पाडणे आवश्यक असल्याने महाबळेश्वर च्या तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुषमा पाटील यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ चे कलम १४४ मधील तरतूदीनुसार आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक १०/१२/२०२१ रोजीचे ००.०० वाजल्या पासून ते २४.०० वाजेपर्यंत लागू राहतील.
१. महाबळेश्वर तालुक्यात अद्यापही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारत घेऊन गेल्या सात आठ महिन्यात आलेले सर्व धर्मीय सण/ उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. त्यामळे या वर्षी दि.१०/१२/२०२१ रोजी शिवप्रातप दिन उत्सव कोविडच्या पार्श्वभुमीवर पुर्ण खबरदारी घेवुन अत्यंत साध्या पध्दतीने पार पाडण्यात यावा.
२. दरवर्षी प्रतापगडावर शासनामार्फत शिवप्रातप दिन साजरा केला जात असून या वेळी मोठया प्रमाणावर नागरीक एकत्र येवून गर्दी होत असते. या वर्षी कोरोना ओमीक्रॉन या विषाणंचा प्रादर्भाव विचारात घेता दिनांक १०/१२/२०२१ रोजी प्रतापगडावर
साजरा होणारा शिवप्रतापदिन फक्त शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीमध्येच साजरा करणेत यावा.
३. या वर्षीचा शिवप्रताप दिन साध्या पध्दतीने साजरा करणेत अपेक्षित असल्याने, कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम, देखावे, प्रदर्शने इत्यादी आयोजित करण्यास सक्त मनाई आहे.
४. नागरिक अकर्षित होऊन गर्दी होऊ नये या करीता कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीच्या प्रदर्शनास मनाई करण्यात येत आहे. या कार्यक्रम ठिकाणी गर्दी होणार नाही यांची आयोजकांनी खबरदारी घ्यावी.
- शिवप्रतापदिन उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही तसेच तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
- उत्सव साजरा करणेचे ठिकाणी थल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करणेत यावा ठिकाणी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क , सॅनिटायझर इत्यादी पाळण्याकडे विशेष लक्ष देणेत यावे
७. सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी कोविड -१९ लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
८. कोविड-१९ ओमीक्रॉन या विषाणचा प्रादर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी विहित केलेल्या नियमाचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ , भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार दंडनीय/ कायदेशीर कारवाई, पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.