
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । फलटण शहरासह तालुक्यात संततधार व मुसळधार पावसामुळे जी पुरपरिस्थिती निर्माण झाली होती; या कालावधीत फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव व निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे हे संपुर्ण महसुल टिमच्या माध्यमातुन अॅक्टिव्ह मोडवर येत काम करत असल्याचे संपुर्ण तालुक्याने बघितले आहे.
फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्यासोबतचा दौरा संपल्यानंतर तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव व निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे यांनी तालुक्याच्या सर्वच मंडलामध्ये दौरा केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी मदत सुध्दा तातडीने उपलब्ध करुन दिली आहे.
सर्व शासकिय यंत्रणांचा योग्य तो समन्वय ठेवत तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी पुरपरिस्थितीचा सामना केला आहे.