तंत्रज्ञान हाउसिंग क्षेत्राला देत आहे नवा आकार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । पॅनडेमिकने गृहउद्योग क्षेत्रामध्ये क्रांती घडून आली आहे. जगण्याची नवी पद्धत, अधिक चांगली जीवनशैली आणि राहत्या जागांच्या रचनेला मिळालेले नवे सुधारित रूप या गोष्टींना या क्षेत्रातील बहुतांश व्यावसायिकांकडून प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. युवा पिढीतील बहुतांश लोक दूरस्थ किंवा मिश्र अर्थात हायब्रिड पद्धतीने काम करत असताना, घरात राहण्याच्या अनुभवाची एक नवी व्याख्या तयार करण्यासाठी अधिकाधिक घरांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट केले जाऊ लागले आहे.

पॅनडेमिकमुळे एक नवी डिजिटल मुक्त जीवनशैली उदयाला आली आहे, जिथे आपल्या खासगी अवकाश आणि सर्व सुविधांनी सुसज्ज जागा यांचा मेळ साधला जावा अशी बहुतांश मिल्येनियल्सची इच्छा असते व अशा जागांच्या ते शोधात असतात. आपल्या घरांचे मूल्य ग्राहकांसमोर मांडताना आम्ही सामाजाभिमुख, सुरक्षित, सोयीस्कर आणि परस्परसहयोगाचा अनुभव देणारी घरे बनवितो हे सांगण्यावरच आज या उद्योगक्षेत्राचा संपूर्ण भर दिसत आहे.या क्षेत्रासमोर कोव्हिड-१९ मुळे आलेल्या अडथळ्यांतून सावरण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होत आहे व त्यातून उच्च तंत्रज्ञानावर आधारित गृहनिर्माणाच्या विपुल संधी पुढे आल्या असल्याचे क्युरेटेड लिव्हिंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि सीईओ श्री. जय किशन चल्ला सांगतात.

सुरक्षा आणि स्वच्छतेची हमी:

पॅनडेमिकनंतरच्या काळात आरोग्य आणि स्वच्छता या गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य मिळत आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि शिस्तबद्ध हॉस्पिटॅलिटी सेवांचा वापर करत स्वच्छता किंवा सुरक्षेशी कुठलीही तडजोड न करता घरात राहण्याचा एक अधिक चांगला अनुभव ग्राहकांना देऊ करण्यासाठीचे मार्ग हाउसिंग क्षेत्राकडून निर्माण केले जात आहेत. उदाहरणार्थ, एआय तंत्रज्ञानाने सुसज्ज थर्मल कॅमे-यामुळे ताप असलेल्या व्यक्ती सहज ओळखल्या जाऊ शकतात तर मास्क न घालणा-या व्यक्तींना बाजूला काढले जाऊ शकते. यामुळे एक संरक्षित जीवन जगण्याचा अनुभव निर्माण करताना त्यातील धोके कमी केले जात आहेत. हाऊसिंग क्षेत्रातील अधिक संघटित स्वरूपाच्या कंपन्या हळूहळू उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेवांकडे आपले लक्ष वळवित आहेत, आणि याच गोष्टी नजिकच्या भविष्यात या क्षेत्राला एक नवी दिशा मिळवून देणा-या ठरणार आहेत.

अखंडित ग्राहक अनुभवासाठी डिजिटाइझ्ड प्रक्रिया:

मोबाइल आणि वेब अॅप्समुळे गृहनिर्माणक्षेत्राशी निगडित जवळ-जवळ सगळ्याच गोष्टी हळूहळू डिजिटाइझ्ड होऊ लागल्या आहेत. व्यवहारांसाठी आजपर्यंत कायम प्रत्यक्ष संवादावर विसंबून असलेले हे क्षेत्र आता व्हर्च्युअल झाले आहे, लोकांनाही अशाप्रकारचा व्यवहार हळूहळू अंगवळणी पडत आहे. जागा शोधण्यापासून ते तिचे बुकिंग करण्यापर्यंत सर्वच टप्प्यांवर तंत्रज्ञानानने सुसज्ज मंचांमुळे खरोखरंच संपूर्ण रेन्टल सेवेला पारदर्शकतेचा व सहजतेचा एक स्तर जोडला आहे. इतकेच नव्हे तर भाड्याने मिळणा-या बहुतांश घरांसाठीची मूव्ह-इन आणि मूव्ह-आऊट प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल केली गेली आहे. अंतिम ग्राहकाच्या वाढत्या गरजा पुरविण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्र एआय आणि एमएल सारख्या नवीन युगाच्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहे, जेणेकरून अधिक चांगल्या आणि ग्राहकांच्या विशिष्ट गरजांबरहुकुम सेवा पुरविता याव्यात.

अतिथी आणि भाडेकरूंसाठी सेवांचे उपयोजन:

सोय हा गृहनिर्माण क्षेत्राचा एक प्रमुख पैलू बनला आहे. या क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्या भाडेकरू व अतिथींना गेस्ट सर्व्हिस अॅप्स पुरवितात. यामुळे भाडेकरूंशी अखंड संपर्क राहतो आणि त्यांनी केलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण केल्या जाण्याची हमी मिळते. शिवाय निवासी व्यक्तींनी तक्रार नोंदवता येते, रूम सर्व्हिस, लॉण्ड्री सर्व्हिसला बोलावता येते किंवा अगदी घर बदलण्याची विनंतीही दाखल करता येते. अधिकाधिक हाऊसिंग ऑपरेटर कंपन्या भाडेकरूंना घरात राहण्याचा अधिक चांगला अनुभव देऊ करताना त्यांच्याशी अधिक सहजतेने संवाद साधण्यासाठी मोबाइल अॅप्सच्या सुविधेकडे वळत आहेत.

डिजिटल माध्यमातून सामुदायिक जीवनाचे निवडक अनुभव:

पॅनडेमिकच्या संकटामुळे लोकांच्या सार्वजनिक आयुष्याला अचानक खीळ बसली असताना डिजिटल संसाधनांमुळे लोकांना पुन्हा एकदा सामुदायिक जीवनाचा एक संपूर्ण अनुभव मिळू लागला आहे. तसेच प्रत्यक्ष होणा-या भेटीगाठींनी ऑनलाइन भेटीगाठींचे रूप घेतले आहे. अनेक गृहसंकुलांमध्ये अधिक चांगला मूल्याधारित आंतरसंवाद साधला जावा यासाठी ऑनलाइन काय्रक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचवेळी ‘को-लिव्हिंग’ संकल्पनेच्या सहाय्याने अधिकाधिक लोक मिश्र जीवनपद्धती अंगिकारत आहेत. सुमारे ९० टक्‍के मिल्येनियल्स अस्ताव्यस्त भाड्याच्या जागेऐवजी अशा को-लिव्हिंग पद्धतीवर आधारलेल्या जागांमध्ये राहणे पसंत करत आहेत. परिणामी, तंत्रज्ञानाने सुसज्ज इमारत रचना आणि प्रक्रियांनी निवासींना अधिक समृद्ध

अनुभव पुरविण्याचे बळ या क्षेत्राला पुरविले आहे. थर्मल कॅमेरे, क्लाउड तंत्रज्ञानावर आधारित देखरेख यंत्रणा आणि टचलेस प्रवेशाद्वारे या गोष्टींमुळे अशा जागांमध्ये राहणा-यांच्या सुरक्षेची अधिक हमी देणे शक्य झाले आहे.

अंतिम टिपण्णी:

तंत्रज्ञानावर आधारित अधिकाधिक कंपन्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असताना गृहनिर्माण क्षेत्र सुसज्ज राहत्या जागा निर्माण करण्याकडे व्यापक पातळीवर वळू लागले आहे. नवीन डिजिटल उपाययोजना आणि सेवांमुळे या क्षेत्रातील स्पर्धा अधिकच वाढली आहे व त्याचवेळी ग्राहकानुभवामध्ये सुधारणेही हमी मिळू लागली आहे. बदलत्या काळाच्या आव्हानांना पुरून उरत टिकून राहण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राकडे असलेली अपूर्व लवचिकता आणि हळूहळू केलेला तंत्रज्ञानाचा स्वीकार यांच्या बळावर पॅनडेमिकनंतरच्या जगामध्ये भरभराट साधण्यासाठी हे जग सज्ज आहे.


Back to top button
Don`t copy text!