स्थैर्य, मुंबई, दि. १३: तंत्रज्ञानाचा वापर करत देशातील असमानता दूर करण्याच्या दिशेने भारत बरीच प्रगती करत आहे. ९० च्या दशकापासून आपल्या अर्थव्यवस्थेतील उदारीकरणाने तंत्रज्ञान आधारीत उपाय विकसित करण्यावर भर देण्यात आला. यामुळे अगदी सामान्यांपर्यंत सेवा पोहोचू लागल्या. २०१६च्या नोटाबंदीनंतर, डिजिटल तंत्रज्ञानच्या स्वीकृतीची गती आणखी वाढली. कागदी चलनाच्या अनुपस्थितीत सर्व वयोगटातील व सर्व समाजातील लोकांनी डिजिटल पेमेंट सुरु केले. कॅशलेस अर्थव्यवस्था उभारण्याच्या दिशेने हे एक पाऊल होते. विशेषत: मिलेनिअल्ससाठी आर्थिक व्यवहार करण्याचे हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. जनरेशन झेड आणि मिलेनिअल लोकसंख्या ही तंत्रज्ञान स्नेही म्हणून ओळखली जाते. त्यांच्या उच्च डिजिटल साक्षरता पातळीमुळे सेवा प्रदात्यांना डिजिटल फर्स्ट सोल्युशन दुप्पट करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
बीएफएसआय कंपन्यांनी हा बदल सर्वाधिक प्रमाणावर स्वीकारला. यात ब्रोकरेज हाऊस, इन्शुरन्स कंपन्या, फिनटेक्स, डिजिटल पेमेंट गेटवे इत्यादींचा समावेश आहे. यापैकी प्रत्येक कंपनी सेवा सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाकरिता संसाधनांची गुंतवणूक करत आहे. कारण त्यांच्या विस्तार धोरणाच्या केंद्रस्थानी मिलेनिअल्स आहेत. डिजिटल फर्स्ट प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञानातील नूतनाविष्कार व मिलिनिअल्सना सेवा देण्यात त्यांची भूमिका याबद्दल विस्ताराने सांगत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी.
डिजिटल फर्स्ट प्लॅटफॉर्मचे आकर्षण:
वित्तीय संस्था आणि इतर सेवा प्रदात्यांच्या पारंपरिक प्रक्रियेत अनेक कागदांच्या प्रत, बहुप्रतीक्षीत ऑनबोर्डिंग प्रक्रिया आणि इतर विलंब आदी प्रकार होते. मात्र याउलट डिजिटल प्लॅटफॉर्मवर युझर्सला याविरुद्ध अनुभव येत आहे. प्रथमच, तंज्ञ व तंत्रज्ञ व्यावसायिकांची टीम मानव-केंद्रित इंटरफेस तयार करण्यात गुंतली आहे. जेणेकरून अगदी किमान डिजिटल साक्षरता असलेली व्यक्ती अॅप्लिकेशनमधील फीचर्सद्वारे सहजपणे सर्फ करू शकते. सर्व प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये यूझर फ्रेंडली लेआउट आणि वेगवान कामे करता येतात.
मिलेनिअल्स ही डिजिटल फर्स्ट पिढी असल्यामुळे, अॅप विकसकांमध्ये या प्लॅटफॉर्मला यशस्वी करण्यासाठी हा वयोगट टार्गेट केला जातो. सोशल मिडिया अॅपच्या संवादात्मक स्वरुपाशी लाखो तरुण यूझर्स सुपरिचित आहेत. समवयस्कर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अगदी ब्रँड्ससोबत ते तासन् तास वेळ घालवतात. 2021 मध्ये आणखी एक लक्षात घेण्यासारखे असे की, अॅपचे यूझर्स सर्व प्रकारचे पसंतीचे काम एकाच प्लॅटफॉर्मवर करण्याला प्राधान्य देतात. या प्लॅटफॉर्मवर ते बोलू शकतात, माहिती, डेटा शेअर करू शकतात, ग्रुप स्थापन करू शकतात, माध्यमे बदलू शकतात. कंपन्या आणि ब्रँड्सना ही जाणीव झाली आहे की, सामान्य यूझर्स टेलिव्हिजन व पर्सनल कंप्यूटर्सपेक्षा स्मार्टफोन आणि मोबाइल अॅपवर जास्त वेळ घालवत आहे. वित्त नियोजनासाठीही हे उपयुक्त ठरत आहेत. कारण लोकांना मल्टीटास्क आणि पैशांसंबंधी प्रमुख मोठे निर्णय दुरूनच घ्यायचे आहेत.
फिनटेक इनोव्हेशन आणि वृद्धीची नवी क्षेत्रे:
आर्थिक सेवा प्रदात्यांनी तयार केलेले डिजिटल प्लॅटफॉर्म हे लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्सवरून जाहिरात आणि ग्राहकांनुसार माहिती घेतात. वन स्टॉप फायनान्शिअल सोल्यूशन टूल होण्याकरिता सध्याच्या प्रणालीला आकर्षक व उत्तम पर्याय ठरणारा प्लॅटफॉम तयार करण्याची कल्पना आहे. पैसे काढणे, चेक डिलीव्हरीसाठी तरुण रांगेत उभे राहण्याची तसेच त्यांचे निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष बँकेला भेट देण्याची कल्पना करू शकत नाहीत. दूरूनच त्यांची खाती व्यवस्थापित करण्याास ते प्राधान्य देतात. शेअर बाजारातील गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर टीअर २ आणि ३ शहरांमधील आहेत. त्यापैकी बहुतांश जनरेशन झेड आणि मिलेनिअल्सच्या वयोगटातील आहेत. यामुळे ब्रोकरेजदेखील कमी किंमतीत आकारले जात असून ऑनबोर्डिंग सुलभ झाले आहे. मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन व ऑपरेटिंगमुळे त्यांना ऑनबोर्डिंगवर शून्य कमिशन रेट देणे परवडत आहे. तसेच इंट्राडे ट्रेडिंगचे शुल्क कमी करणे आणि इतर असंख्य सुविधा पुरवणे शक्य होत आहे.
प्रथमदर्शनी, काही सोपे आर्थिक बदल करून हे काम सोपे असल्याचे जाणवते. मात्र बऱ्याच मोठ्या योजनांमध्ये तंत्रज्ञान चातुर्य आणि नावीन्य गमावले जाते. एआय, मशीन लर्निंग, डेटा अॅनलिटिक्स आणि इतर बरेच तंत्रज्ञान एकत्रित करून, फिनटेक हे वित्तीय कंपन्यांना अत्याधुनिक सोल्युशन्सद्वारे व्हॅल्यू साखळीच्या प्रत्येक पातळीवर मदत करीत आहेत. यामुळे भारतात त्यांची अमाप वाढ होत आहे. आज डेटाचे विश्लेषण कसे करावे तसेच ग्राहकांना सर्वाधिक कशाची गरज आहे हे ओळखण्यासाठी ग्राहकांची पसंत ट्रॅक केली जाते, त्याचे विश्लेषण केले जाते व शिफारशीही पुरवल्या जातात. तसेच एआय संचलित चॅटबॉट्स ही प्रक्रिया मानवी चुकांपासून मुक्त ठेवत ग्राहकांच्या समस्यांकडे मानवतावादी दृष्टीकोनातून लक्ष वेधतात.
मिलेनिअल्सची निर्णय क्षमता आणि ‘डिजिटल’ची भूमिका:
आजचे मिलेनिअल्स सोन्यासारख्या भौतिक वस्तूंसाठी गोल्ड ईटीएफच्या स्वरुपात गुंतवणूक करू शकतात. ही मालमत्ता घेण्यासाठी त्यांना सोने व्यापारी किंवा बँकेला भेट द्यावी लागत नाही. डिजिटल पेमेंट पर्यायांद्वारे ते अगदी कमी एक ग्रॅम सोनेही खरेदी करू शकतात. यावर शेअर गुंतवणूक, म्युच्युअल फंड इत्यादी सेवाही मिळतात. याचे कारण म्हणजे, तरुण गुंतवणुकदारांनी सुरुवातीपासून गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांना कळाले आहे. नव्या काळातील डिजिटल ब्रोकरेज वित्तीय बाजारपेठ आणि त्यामागील अर्थकारणासाठी व्हर्चुअल ट्रेडिंग फीचर्स, लिटरेचर आणि शिक्षण साहित्य पुरवले जाते. ट्रेड्स आणि व्यवहार करताना ग्राहकांना हे सर्व उपलब्ध होऊ शकते.
डिजिटल फर्स्ट प्लॅटफॉर्मचे हे समग्र स्वरुप आहे. तंत्रज्ञान अंतर्दृष्टीद्वारे जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यावर त्यांचा भर आहे. मिलेनिअल्सना सहभागी करून घेतल्याचा अनुभव येतो, त्यांच्या आवडींचे योग्य वर्गीकरण केले जाते आणि वित्तीय भविष्य सुरक्षित करण्याची गरज त्यांना भासते. यामुळेच डिजिटल प्लॅटफॉर्मने अनेक पातळ्यांवर केलेली प्रगती त्यांना आकर्षित करीत आहे.