दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । फलटण । फलटण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पुणे ते बेंगलोर ह्या महामार्गास समांतर हरित महामार्ग करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केलेली होती. सदरील महामार्ग हा फलटण मार्गे जाणार असल्याची माहिती सुध्दा ना. गडकरी यांनी दिलेली होती. सदरील महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. सदरील महामार्गास ना. गडकरी यांनी तांत्रिक मंजुरी दिली असुन त्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुणे ते बंगलोर हा महामार्ग फलटण वरून जाणार असल्याने फलटण शहरासह तालुक्याचा विकास होणार आहे. फलटण तालुक्यातुन हरित महामार्ग जात असल्याने तालुक्यातील उद्योग व व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. हरीत महामार्ग फलटण वरून जात असल्याने उद्योग व्यवसायासह शेती व शेती पुरक व्यवसायांना फायद्याचे ठरणार आहे.