समृद्ध पिढ्यांसाठी जीवन समर्पित करणारे शिक्षक हेच खरे राष्ट्राचे वैभव – आमदार जयंत आसगांवकर (युवा नेते वैभवदादा पाटील)


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । आटपाडी । समृद्ध पीढ्यांसाठी जीवन समर्पित करणारे शिक्षक हेच खरे राष्ट्राचे वैभव आहेत . कामथ येथील श्रीमंत माने सरांचे कार्य अशाच उदात्त परंपरेतील असून सरळमार्गी जीवन जगण्याबरोबरच त्यांनी उपद्रवमुल्य दाखवल्यासच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल प्रत्येक जण घेईल आणि त्यांनी ते यापुढे दाखवावे . अशा अपेक्षा पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगांवकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सांगली जिल्हयाचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केल्या .

आटपाडी एज्युकेशन आटपाडीच्या खवासपूर हायस्कुल मधून मुख्याध्यापक पदावरून, ३१ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले कामथचे सुपुत्र श्रीमंत माने सर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री माने, माने सरांचे माता – पिता, सौ .सोनाबाई भगवान माने, श्री . भगवान रामा माने यांचा सत्कार उभय मान्यवरांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुणराव वाघमारे, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज पाटील, कामथच्या सरपंच सौ. रुपाली ज्ञानेश्वर कारंडे यांच्या उपस्थितीत करणेत आला . यावेळी बोलताना आमदार आसगांवकर – वैभवदादा पाटील यांनी ही अपेक्षा व्यक्त केली .

सर्वस्पर्शी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजीक सेवेत कार्यरत रहावे . आजच्या गोंधळाच्या स्थितीत शिक्षकांच्या भूमिकेने समाजाला योग्य दिशा मिळू शकते असे ही आपल्या भाषणात आमदार जयंत आसगांवकर यांनी स्पष्ट केले . शिक्षण संस्थामुळे माध्यमिक शिक्षकांना मोठी संधी मिळते . संस्था चालक पालक विद्यार्थी यांच्यात समन्वय साधतच प्रत्येकाने उर्वरीत आयुष्य समाजासाठी वेचावे असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी दिला.

देशाचे मालक असलेल्या, अनाथ, भिकारी, रंकापासून रावांपर्यत सर्वच नागरीकांची, पन्नासीनंतरच्या उत्तरार्धातील खाणे, पिणे, राहणे, औषधोपचारा पासून सर्व जबाबदारी केंद्र सरकारने स्विकारली पाहीजे . हे शासनाचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी, आज देश वाईट स्थितीतून वाटचाल करतो आहे . संविधानावर घाला घालण्याचे, लोकशाही व्यवस्था उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरु आहे . देशाच्या नागरीकाला सर्वच व्यवस्थांमधून पिळून काढले जात आहे . देशाच्या असंख्य व्यवस्थांची वाट लावली जात आहे, अशा स्थितीत शिक्षक हाच प्रामाणिक घटक देशाला सर्व संकटापासून दुर करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो . कोट्यावधी तरुणांना देशाभिमानी बनविण्याचे काम शिक्षकच करू शकतात . सेवानिवृत्ती नंतर प्रत्येकाने घडविलेल्या पीढ्यांना शहाणे – सजग करण्यासाठी सदैव कार्यरत रहावे, अशी प्रांजळ अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त केली .

उपेक्षित, वंचित, मागासवर्गीय आणि बहुजनांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे सतत स्मरण करणे अत्यंत गरजेचे असून त्यांच्यामुळेच आज आपले दशावतार संपले आहेत . आज आपण सन्मानाने जीवन जगत आहोत . आपल्या कार्याचा प्रारंभ आणि शेवट जयभीम नेच करावा , अशा भावना व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुणराव वाघमारे यांनी, श्रीमंत माने, सुभाष माने बंधु सह त्यांच्या परिवाराला नावारूपाला आणणाऱ्या माने सरांच्या माता पित्यांचा प्रथम सत्कार करा. असा आग्रह धरला .
विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून शिक्षक आपला उमेदीचा काळ भारताची भावी पिढी घडवण्यासाठी सार्थकी लावतात . सेवानिवृत्तीनंतर आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा आणि कौशल्याचा उपयोग शिक्षकांनी सामाजिक उन्नतीसाठी व समाजातील उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी , सामाजिक प्रबोधनासाठी करावा अशा भावना प्रसिद्ध व्याख्याते दीपक रणदिवे सर यांनी केला .
यावेळी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वाय. डी . सरक सर , कृष्णदेव ढेरे, आण्णासाहेब गायकवाड सर सांगोला, शिवाजीतात्या पाटील, देविदास कोकरे, नितीन डांगे, सुनिल लेंगरे, सुनिल सरक, मोहन खरात, डी . एम . कदम, सी एम कोकरे, ए. एस . पवार, एस .एन तथा बाळासाहेब चव्हाण सर, राजेंद्र माने तानाजी माने बादशहाभाई इनामदार बी. बी . वगरे, सदाशिव सरक जी .एन . कबीर सर, मच्छिंद्र पाटील विकी बेरगळ माळेवाडीचे माजी सरपंच जगताप, सुनिल ऐवळे, रणजित ऐवळे महादेव कांबळे,अमोल लांडगे रविंद्र लांडगे इत्यादी अनेक जण उपस्थित होते. प्रारंभी सुभाष माने सर यांनी स्वागत प्रास्तावीक केले . सुत्रसंचालन व आभार गणेश ऐवळे सर यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!