दैनिक स्थैर्य | दि. ९ सप्टेंबर २०२३ | सातारा |
‘५ सप्टेंबर’ या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी देशभरात ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून फलटण येथील मुधोजी महाविद्यालयाच्या भूगोल विभागात शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
बी.ए. भाग-तीन आणि बी. ए. भाग-दोन च्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा करताना आपल्या शिक्षकांविषयी वाटणारा आदर व्यक्त करण्यासाठी वर्षभरातील विविध उपक्रमांवर आधारित चित्रफित तयार केली होती. त्या चित्रफितीचे सादरीकरण करून, एकतेची प्रार्थना सादर करीत कुंडीतील वृक्षाला जलदान करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांना व प्रमुख अतिथींना पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चित्रफितीद्वारे करण्यात आली.
बी.ए. भाग-तीन ची विद्यार्थिनी कु. साक्षी बुढा हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांमध्ये दिपक निगडे, तुषार निगडे, कु. स्नेहलता बिचुकले व कु. अश्विनी गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रा. विजय मदने, प्रा. डॉ. अभिजित धुलगुडे, प्रा. डॉ. राहुल चौरे, प्रा. डॉ. दशरथ बंदुके यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. ए. एन. शिंदे सर यांनी शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांचे स्थान आजही उच्च असल्याचे मत व्यक्त केले. तसेच भूगोल विभागप्रमुख प्रो. डॉ. टी. पी. शिंदे सर यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम साहेब यांनी कौशल्यपूर्ण शिक्षण हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भूगोल विभागातील प्रा. डॉ. आशिष जाधव, प्रा. प्रकाश शिंदे, प्रा. कु. गायत्री पवार, प्रा. नितीन आगवणे, प्रा. सुरेश वळवी कार्यक्रमास उपस्थित होते. कु. पूजा साबळे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्वात शेवटी विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने केक कापून आनंद साजरा केला. बी.ए. भाग-तीनचा विद्यार्थी सूरज लवंगारे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.