
दैनिक स्थैर्य । 21 जुलै 2025 । फलटण । येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये शनिवारी दि. 19 रोजी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील पहिली शिक्षक- पालक सहविचार सभा उत्साहात झाली.
यावेळी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट, अध्यक्ष प्रमोद सस्ते गणपत, उपाध्यक्ष सौ. राजेश्री राहिगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख सौ. भागवत, कला विभाग प्रमुख एस. व्ही. गायकवाड, शास्त्र विभागप्रमुख पी. व्ही. साळुंखे, वाणिज्य विभाग प्रमुख ए. एस. तांबोळी, किमान कौशल्य विभागप्रमुख जे. ए .नाळे यांच्याहस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ए. एस.तांबोळी यांनी शिक्षक- पालक सहविचार सभेचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. सौ. भागवत मॅडम यांनी माध्यमिक विभागात राबविण्यात येणार्या नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, एन. एम. एम. एस., एम. टी. एस., हिंदी राष्ट्रभाषा, एलिमेंट्री इंटरमिजिएट परीक्षा, ए. आय. विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
प्रशालेचे प्रभारी प्राचार्य मा श्री घनवट पी डी यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून उपस्थित पालकांना प्रशालेमध्ये राबवण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची सखोल अशी माहिती दिली. सहविचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल पालकांचे स्वागत व आभार मानले. टेक्निकल विषयाचे सखोल ज्ञान देणारी शाळा म्हणजे यशवंतराव चव्हाण हायस्कूल सौ. राजश्री विशाल राहीगुडे यांनी काढले.समाजातील एक आदर्श व सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे धडे दिले जातात व एक आदर्श भारतीय नागरिक घडवण्याचे कार्य शाळेमधून होत असते या गोष्टीचा विचार पालकांनी केला पाहिजे असे मत आपल्या मनोगत आतून त्यांनी व्यक्त केले. सी. एस. सस्ते सूत्रसंचालन केले. ए. एस. तांबोळी यांनी केले. एस. वाय. आभार यांनी चोरमले मानले.