कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाचा प्रश्नांची शिक्षक आमदारांनी घेतली दखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, लातूर, दि. ०५ : महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित वरीष्ठ महाविद्यालय प्राध्यापक व कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 3 जुलै रोज शुक्रवारला दुपारी 1:00 राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजित करण्यात आला होता. हा वेबिनार आयोजित करण्याचा मुख्य उद्देश राज्यातील 2001 नंतरच्या कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढून प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे.

संघटनेच्या वतीने दिनांक 19 जून 2020 पासून बेमुदत घरबैठे आंदोलन सुरू करण्यात आले व आतापर्यंत सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, संघटनेने या आंदोलनाची माहिती राज्यातील सर्वचसन्माननीय शिक्षक आमदार महोदयांना दिली व त्यांककडे शासनाप्रती रोष व्यक्त करण्यात आला.

म्हणून हा वेबिनार आयोजित करण्यात आला. या वेबिनारमध्ये शिक्षक आमदार सर्वश्री विक्रम काळे साहेब (औरंगाबाद), मा. डॉ. सुधीर तांबे, (अहमदनगर) नागो गाणारव (नागपूर), दतात्र्यय सावंत (पुणे), श्रीकांत देशपांडे (अमरावती), बाळाराम पवार (कोकण) शिक्षणतज्ञ प्राचार्य  डॉ. दिपक धोटे (अमरावती), व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून प्राचार्य डॉ. संजय गायकवाड (औरंगाबाद) सचिन सूर्यवंशी (सातारा), मा. प्रा. मोहम्मद मझोरुद्दीन मोहम्मद खलीलोदिन (नांदेड) हे मान्यवर

वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. डॉ. दिपक धोटे यांनी सांगितले की वरिष्ठ महाविद्यालयाना अनुदान देने क्रमप्राप्त आहे, कारण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचा कायम शब्द काढून अनुदान देण्याचे सूत्र सरकारने स्वीकारले आहे मग वरिष्ठ महाविद्यालयाना का नाही. वास्तविक पाहता वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदाना 50% केंद्र सरकारने उचलते व UGC, RUSA या सारख्या स्वायत्त संस्था अनुदान देते ते वेगळे, तसेच राज्याचे उच्च शिक्षणाचे प्रमाण फक्त 19% आहे व हे प्रमाण वाढवले तरच RUSA च्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल.

वरिष्ठ महाविद्यालयासोबत सरकारने जो भेदभाव केला तो या महाविद्यालयाना अनुदान देऊन नष्ट करावा असेही सुचवले आहे.

आ. विक्रम काळे म्हणाले की तुमची मागणी रास्त आहे तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन व जोपर्यंत तुमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले मी 2012 ला राजेश टोपे मंत्री असताना या विषयावर अजितदादा बरोबर बैठक लावली होती परंतु यश आले नाही म्हणून आता तुम्ही ही मागणी मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांनाही अर्ज, विनंती निवेदन देऊन त्यांनाही हा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. आ. ना. गो. गाणार म्हणाले की सरकारने आता अंत पाहू नये ताबडतोब अनुदान द्यावे. आ. दतात्र्यय सामंत यानी सांगितले की आम्ही उदय सामंत साहेबाना या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो, आ. श्रीकांत देशपांडे व आ. बाळाराम पवार यांनी सांगितले की दोन ते तीन दिवसात आम्ही शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करतो तुम्ही आंदोलन मागे घ्या. परंतु गेल्या 20  वर्षांपासून आम्हाला वेतन नाही आम्ही आमचे जीवन कसे जगायचे हा गंभीर प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे. म्हणून जो पर्यंत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत आमचा प्रश्न मार्गी लावणार नाही तो पर्यंत माघार नाही.

जर आमच्या प्रश्नाचे गांभीर्य समजून घेतले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय गंगाधर जाधव, सचिव डॉ. देवमन कामडी, उपाध्यक्ष डॉ. विवेक घोलप, कोषाध्यक्ष प्रा. नितीन बनकर, राज्य संघटक डॉ विनायक टाळकुटे, सहसचिव डॉ. स्मिता अंबादे  डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, प्रा.ईश्वर शिंदे, डॉ. सुजाता गौरखेडे, वसंत बागल, प्रा. किरण पवार, प्रा. निलेश भारसाखळे, प्रा. सारिका दमाहे, किरण राऊत, राजेश पवार, डॉ. दादा मरकड, डॉ. उस्मान गणी, डॉ वाजीद सय्यद, डॉ. नामदेव गवळी व सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच सर्व जिल्हा सचिव यांनी सहमतीने सांगितले.

या वेबिनारचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय गंगाधर जाधव यांनी केले व आभार संघटनेचे सचिव डॉ. देवमन कामडी यांनी केले. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी डॉ संजय मुजमले, डॉ. सचिन बनसोड, डॉ. भाऊसाहेब मुले, डॉ. शुभास मुरहे, संदीप  बकाल, प्रा. श्रीकृष्ण तिडके प्र. विजय मांढरे, यांचे मी विशेष अभिनंदन करतो व अनेकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मेहनत घेतली या सर्वांचे तसेच कायम विना अनुदानित वरीष्ठ महाविद्यालयात काम करणारे प्राध्यापक व कर्मचारी यांनी खुप मोठ्या प्रमाणात वेबिनार मध्ये सहभाग नोंदवला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!