टीसीएलची टाटा क्लिकसह भागीदारी


 

स्थैर्य, मुंबई, दि.१: टीसीएल या जगातील दुस-या क्रमांकाची टीव्ही निर्माता आणि अग्रगण्य कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने भारतभरात स्मार्ट एअर कंडिशनरची बाजारपेठ वाढवण्याच्या उद्देशाने टाटा क्लिकसह भागीदारी केली आहे. टीसीएलचे वापरकर्ते आता टाटा क्लिकवरूनही एसी खरेदी करू शकतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असे हे टीसीएलचे एसी या नव्या ई-कॉमर्स मंचावर २३,९९० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

टीसीएल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक माइक चेन म्हणाले, “टाटा क्लिकसोबत भागीदारी करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. ही संस्था आम्हाला आमच्या एसीच्या विक्रीसाठी आणखी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईल. एवढेच नव्हे तर आम्हाला संपूर्ण भारतभरात उपस्थिती दर्शवण्यासाठी मदत करेल. या मैत्रीचा असाच विकास होईल आणि याही पलिकडे जाऊन दोन्ही बाजूंना महत्त्व प्राप्त होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

टीसीएल स्मार्ट एसीमध्ये एआय अल्ट्रा-इन्व्हर्टर कॉम्प्रेसर टेक्नोलॉजी असून त्याद्वारे ते जास्तीत जास्त आरपीएमवर चालते. तसेच ६० सेकंदात १८अंश सेल्सिअसपर्यंत तापमान कमी होण्याची खात्री देते. या सुविधेद्वारे यूझर्सना ५० टक्के वीज बचतीची खात्री देत वीजबिल कमी करण्यास मदत केली जाते. स्मार्ट कनेक्टिव्हिटी द्वारे ग्राहकांना स्मार्ट फोन किंवा साध्या आवाजी आदेशाने एसी नियंत्रित करता येईल. आय फील टेक्नोलॉजी या अॅडव्हान्स्ड रिमोट सेंसर्सद्वारे खोलीचे तापमान अचूकतेसह मोजले जाते आणि त्यानुसार धोकादायक कुलिंगचे नियंत्रण केले जाते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!