टीसीएल मिनी एलईडी क्यूएलईडी टीव्हींमध्ये अग्रस्थानी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । मुंबई । टीसीएलने २०२२ मध्ये मिनी एलईडी क्यूएलईडी टीव्हींमधील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. उच्च कॉन्ट्रास्ट, सर्वोत्तम ब्राइटनेस, अल्ट्रा-थिन प्रोफाइल आणि इतर अनेक स्थानिक डिमिंग झोन्ससह मिनी एलईडी तंत्रज्ञान टीसीएल २०२२ टेलिव्हिजन्सना अपवादात्मक पिक्चर व कलर क्वॉलिटी देते. यामधून फास्ट-मूव्हिंग इमेजेस कोणत्याही फ्लिकरिंग किंवा शेकिंगशिवाय परिपूर्णपणे दिसण्याची खात्री मिळते. २०१८ पासून टीसीएलला मिनी एलईडी तंत्रज्ञानामधील त्यांच्या उपलब्धीचा अभिमान राहिला आहे. कंपनीला मीडिया व व्यावसायिक संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

२०२२ मध्ये टीसीएलने मिनी एलईडी तंत्रज्ञानाची त्यांची आधुनिक पिढी आणली. ज्यात अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात संपन्न रंगसंगती आणि अधिक सुस्पष्ट चित्र दिसण्याच्या खात्रीसाठी १६-बीट अल्ट्रा-प्रीसाइस लाइट कंट्रोल सुविधा, शुद्ध काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर दिसणा-या सफेद रंगाच्या वस्तूंचे चित्र दूर करण्यासाठी वक्राकार हॅलो मिनी एलईडी, स्क्रिनवर फास्ट-मूव्हिंग चित्रे सुस्पष्टपणे दिसण्यासाठी टीसीएल मिनी एलईडी बॅकलाइट डायरेक्ट, एकसमान रंगसंगतीमध्ये चित्र दिसण्यासाठी मिनी एलईडी युनिफॉर्म क्वॉलिटी, एकसमान लाइट कंट्रोलसाठी (स्पॉटलाइट नाही, ग्रे पॅच नाही, अस्पष्ट लाइट नाही) टीसीएल मिनी एलईडी बॅकलाइट डि-मूरा आदींचा समावेश आहे.

मिनी एलईडीमध्ये अग्रस्थानी: ओडी झीरो मिनी एलईडी

ओडी झीरो मिनी एलईडीमध्ये सर्वात लहान एलईडी चिप आहे आणि स्थानिक डिमिंग झोन्सची संख्या दुप्पट करते. एलईडी चिप कमी असल्यामुळे टीसीएल टेलिव्हिजन्स बॅकलायटिंग अचूकपणे वाढवत अल्टिमेट कॉन्ट्रास्ट व ब्राइटनेस देतात. प्रमाणित ऑप्टिकल डिस्टन्स दूर करत ब्रॅण्ड आतापर्यंतचा सर्वात स्लिम डायरेक्ट-लिट टेलिव्हिजन्स निर्माण करू शकतो.

टीसीएल सी सिरीज टेलिव्हिजन्स युजर्सना अपवादात्मक व्युइंग आणि मनोरंजनपूर्ण क्यूएलईडी ४के अनुभव देण्याप्रती ब्रॅण्डच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेमधील आवश्‍यक भर आहेत. २०२२ मध्ये या सिरीजच्या (टीसीएल सी८३५) उच्च-स्तरीय श्रेणी मॉडेल्समध्ये मिनी एलईडी तंत्रज्ञान देखील समाविष्ट करण्यात आले. डॉल्बी अॅटमॉस असलेल्या उद्योग-अग्रणी साऊंड सिस्टिमसह सुधारित हे टेलिव्हिजन्स युजर्सना सर्व प्रकारच्या ऑन-स्क्रिन कन्टेन्टशी सखोलपणे जुळून जाण्याची सुविधा देतात; टीसीएल गेमिंग क्षेत्रातील सक्रिय कंपनी आहे, ज्यामुळे गेमर्सना त्यांचा गेमिंग अनुभव वाढवण्यासाठी उच्च दर्जाच्या स्क्रिन्स व अविरत प्लेइंग पर्याय मिळतात. टीसीएल सी८३५ ५५-इंच, ६५-इंच व ७५-इंच स्क्रिन आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ११९,९९० रूपये, १५९,९९० रूपये आणि २२९,९९० रूपये आहे.

टीसीएल पी सिरीज टेलिव्हिजन्स किफायतशीर ४के एचडीआर टेलिव्हिजन्स (सर्वोत्तम कॉस्ट कंट्रोल, सर्वोत्तम डिझाइन आणि व्यापक कलर गम्यूट) आहेत, ज्यामध्ये गुगल टीव्ही देखील आहे. उपरोक्त वैशिष्ट्ये व तंत्रज्ञानाशिवाय टीसीएल पी७३५ मध्ये एमईएमसी (मोशन एस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन), डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉस आहे. तसेच यामध्ये टीसीएलच्या प्रोप्रायटरी अल्गोरिदमची शक्ती देखील आहे आणि एएलएलएम ऑप्टिमायझेशन आहे, जे आपोआपपणे लो-लॅग प्रीसेट्समध्ये बदलत सुलभ गेमप्लेचा आनंद देते. टीसीएल पी७३५ ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच स्क्रिन आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ३५,९९० रूपये, ४१,९९० रूपये, ४९,९९० रूपये आणि ६९,९९० रूपये आहे.


Back to top button
Don`t copy text!