टीसीएलने ठाण्यात प्रिमिअम ४के टीव्ही लॉन्च केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । चार दशकांहून अधिक काळाचा वारसा साजरा करत टीसीएल या जगातील पहिल्या क्रमांकाच्या अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने टाटा ग्रुपचा भारतातील पहिला व विश्वसनीय ओम्नी-चॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमामध्ये त्यांच्या कैलाश नगर, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र येथील स्टोअरमध्ये तीन नवीन उच्च-स्तरीय नवोन्मेष्कारी उत्पादने लॉन्च केली आहेत. नुकतेच लॉन्च करण्यात आलेली उत्पादने आहेत: सी८३५: १४४ हर्टझ व्हीआरआर असलेला गेमिंग मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही, सी६३५ अॅक्शन सिनेमा क्यूएलईडी ४के टीव्ही आणि पी७३५ ४के एचडीआर गुगल टीव्ही.

ही पुरस्कार-प्राप्त ४के नवोन्मेष्कारी उत्पादने खरेदी केल्यानंतर ग्राहक २,९९९ रूपये किंमत असलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा आणि एसबीआय बँक कार्ड्सचा वापर करत जवळपास १०,००० रूपयांच्या अतिरिक्त कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. या अनावरण समारोहाचा भाग म्हणून टीसीएलने सोशल मीडिया प्रभावक व लोकप्रिय भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा ए गोर हिची नियुक्ती केली, जिने पाठिंबा देण्यासोबत इव्हेण्टचे उद्घाटन केले.

टीसीएल इंडियाचे विपणन प्रमुख विजय कुमार मिक्किलिनेनी म्हणाले, “स्थापनेपासून टीसीएलने ग्राहकांना किफायतशीर, पण प्रिमिअम उत्पादने देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला माहित आहे की आमच्या ग्राहकांना सोईस्कर व कार्यक्षम जीवनशैली जगण्यासाठी स्मार्ट उत्पादने व सेवांची गरज आहे. यासंदर्भात टीसीएल ग्राहकांना घरामध्ये सुधारित सिनेमॅटिक, गेमिंग व मनोरंजन अनुभव देण्यासाठी विद्यमान टीव्ही तंत्रज्ञान सुधारण्याचा आणि प्रगत यंत्रणांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवत आहे. तसेच आमची उत्पादने आधुनिक आकर्षकता लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहेत. ग्राहक या टीव्‍हींना हॉल, बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये स्थापित करू शकतात आणि सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेऊ शकतात. आमचा जीवनाच्या विविध स्तरांमधील ग्राहकांना अत्याधुनिक टीव्ही तंत्रज्ञान आणि इतर स्मार्ट होम इलेक्ट्रॉनिक्सचा अनुभव देत राहण्याचा मनसुबा आहे.”


Back to top button
Don`t copy text!