टीसीएलने ४के टीव्ही सी७२५ आणि पी७२५ चे लाँच केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । मुंबई । जागतिक दुस-या क्रमांकाचा एलसीडी टीव्ही ब्रॅण्ड टीसीएलने गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर कोहिनूर येथे प्रिमिअम व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही सी७२५ आणि ४के एचडीआर टीव्ही पी७२५ लाँच करत उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर घातली आहे.

टीसीएल सी७२५ क्यूएलईडी ४के टीव्हीमध्ये उच्च दर्जाच्या पिक्चर क्वॉलिटीसह क्यूएलईडी तंत्रज्ञान व डॉल्बी व्हिजन आहे. तसेच या टीव्हीमध्ये अनेक कनेक्टीव्हीटी वैशिष्ट्यांसह व्हिडिओ कॉल आहे. क्यूएलईडी टीव्ही अपवादात्मक पिक्चर क्वॉलिटीसाठी आकर्षक कलर्स, सुधारित कॉन्ट्रास्ट आणि अद्वितीय सुस्पष्टतेची खात्री देतो, तसेच गुगल ड्युओ अॅपच्या माध्यमातून मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ कॉल्स करण्याची सुविधा देतो. सी७२५ मध्ये स्मार्ट यूआय, गतीशील रिफ्रेश रेट, एमईएमसी व एआयपीक्यू इंजिन आहे, जे वास्तविक रूपात पिक्चर दिसण्याची खात्री देतात. गुगल असिस्टण्टच्या माध्यमातून युजर्स चॅनेल्स बदलू शकतात, आवाज समायोजित करू शकतात, प्लेबॅक नियंत्रित करू शकतात आणि त्‍यांच्या वॉईस कमांडसह अ‍नेक गोष्टी नियंत्रित करू शकतात. टीसीएल नवोन्मेष्कारांना सादर करते, जेथे तंत्रज्ञानाला आधुनिक डिझाइन्सची जोड आहे.

टीसीएल स्मार्ट एआय व अँड्रॉइड आर(११) ची शक्ती असलेल्या पी७२५ मध्ये अत्याधुनिक इंटेलिजण्ट फंक्शन्स व अनेक मनोरंजन अनुभव देण्यासाठी मॅजिकल वेब कॅमेरा आहे. प्रेक्षकांना एमईएमसीच्या माध्यमातून अत्यंत सुलभ व्हिज्युअल्सचा देखील आनंद मिळतो. हा टीव्ही अधिक इंटरअॅक्टिव्ह कार्यक्षमता व सर्वोत्तम मनोरंजनासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा टीव्ही प्रत्येक कोप-यामधून आकर्षक दिसतो आणि या टीव्हीमध्ये मेटलिक स्लिम बेझेल-लेस डिझाइन व इन्वर्टेड व्ही-शेप स्टॅण्डसह फॅब्रिक स्टॅक आहे, जे टीव्हीच्या मध्यभागी असून त्यामध्ये पॉवर एलईडी आहे.

गुढीपाडव्याच्या शुभ मूहूर्तावर व्हिडिओ कॉल क्यूएलईडी ४के टीव्ही सी७२५ कोहिनूर येथे फक्त ५३९९० रूपये या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे. ब्रॅण्ड पहिल्यांदाच अर्ली बर्ड ऑफर्ससाठी नियोजन करत आहे, जेथे ब्रॅण्ड १७,००० रूपयांचा ब्ल्यूटूथ स्पीकर मोफतपणे देईल. यासोबत ग्राहकांना २,९९९ रूपयांचा व्हिडिओ कॉल कॅमेरा देखील मोफत मिळेल (१० एप्रिल २०२२ पर्यंत वैध). ग्राहकांना अतिरिक्त १० टक्के कॅशबॅक आणि अधिक आकर्षक ऑफर्सचा देखील आनंद घेता येईल.

या लाँचबाबत बोलताना टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक शेन म्हणाले, ”युजर्सना सर्जनशील जीवन देण्याच्या मनसुब्यासह आम्ही विचारशील डिझाइन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अर्थपूर्ण अनुभव देतो. आमचे व्यापक उत्पादन कौशल्य, सर्वोत्तमरित्या एकीकृत पुरवठा साखळी आणि अत्याधुनिक पॅनेल फॅक्टरी सर्वांना नवोन्मेष्कार देण्यामध्ये मदत करतात. जीवनाला सर्वोत्तम बनवण्याच्या दृष्टीकोनासह आमचा विश्वसनीय आणि आंतरराष्ट्रीयदृष्ट्या स्पर्धात्मक ब्रॅण्ड बनवण्याचा विश्वास आहे. ब्रॅण्डचे मुख्य ध्येय उत्पादने व सेवांच्या संदर्भात अचूक परिपूर्णता संपादित करण्याचे आहे.”

ब्रॅण्ड भारताला महत्त्वपूर्ण व धोरणात्मक बाजारपेठ मानतो आणि भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्यापासून टीसीएलचे मिशन बदलले नाही. ते सातत्याने भारतात नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करत आहेत, जी स्थानिक ग्राहकांच्या गरजांनुसार आहेत. २०१७ मध्ये ब्रॅण्डने हर्मन/कार्डन स्पीकर असलेला भारताचा पहिला ४के अँड्रॉईड टीव्ही लाँच केला. फक्त एवढेच नाही ब्रॅण्डने भारतामध्ये हर्मन/कार्डन स्पीकर असलेला पहिला ४के क्यूएलईडी टीव्ही देखील लाँच केला. २०१९ मध्ये ब्रॅण्डने हॅण्ड्स–फ्री वॉइस कंट्रोलने युक्त पहिला ४के अँड्रॉईड टीव्ही लाँच केला. त्यानंतर सलग वर्ष २०२० व २०२१मध्ये ब्रॅण्डने भारतामध्ये आयमॅक्स एन्हान्स्ड असलेला पहिलाच मिनी एलईडी ४के अँड्रॉईड टीव्हीसोबत अनेक उत्पादने लाँच केली.

टीसीएल इंडियाचे विपणन प्रमुख विजय कुमार मिक्किलिनेनी म्हणाले, ”आम्ही समजतो की, आमच्या ग्राहकांना किफायतशीर उत्पादनांची गरज आहे, जी त्यांना विकसित होण्यामध्ये आणि त्यांचे जीवन सर्वोत्तम करण्यामध्ये मदत करू शकतात. टीसीएल स्मार्ट होम इलेक्ट्रॉनिक्सची परिपूर्ण श्रेणी देते, ज्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि ग्राहकांना त्यांचे जीवन स्मार्टर करण्यामध्ये मदत करते. टीसीएलबाबत सर्वोत्तम बाब म्हणजे आम्ही किफायतशीर दरांमध्ये आमच्या उत्पादनांची प्रिमिअम श्रेणी देत सर्वांसाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. टीसीएलला ग्राहकांच्या गरजा उत्तमरित्या माहित आहेत आणि आमचे प्रत्येक ग्राहकाला प्रत्येक वेळी अपवादात्मक सर्जनशील व स्मार्टर जीवन देण्याचे ध्येय आहे.”


Back to top button
Don`t copy text!