टीसीएलने फ्लिपकार्टसोबत सादर केली स्मार्ट टीव्हीची रेंज

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२७: जागतिक टॉप-टू टेलिव्हिजन ब्रँड आणि आघाडीची कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या टीसीएलने स्मार्ट टीव्ही रेंज आणि इतर उत्पादनाच्या लाँचिंगची घोषणा केली. भारतात तयार झालेले इ-कॉमर्स मार्केटप्लेस- फ्लिपकार्टसोबत भागीदारी करत ही उत्पादने लाँच करण्यात आली. ३ वर्षांपूर्वी आयफाल्कन या सब ब्रँडअंतर्गत फ्लिपकार्टवर यशस्वी लाँचिंग केल्यानंतरच्या या नव्या लाँचिंगद्वारे टीसीएलसाठी भारतातील स्मार्ट डिव्हाइस मार्केटचे वाढते महत्त्व लक्षात येते.

भारतातील इ-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या ब्रँडसोबत एक मोठे पाऊल टाकण्याची ही प्रक्रिया आहे. याद्वारे फ्लिपकार्टवर देशभरातील ग्राहकांना टीसीएलची उत्पादने खरेदी करता येतील. टीसीएल उत्पादनांच्या विविध प्रकारांतून अनेक टीव्ही मॉडेल्स आणत आहे. यात पी७१५ ४के युएचडी एआय टीव्ही, सी७१५ ४के  क्यूएलईडी टीव्ही, सी८१५ ४के क्यूएलईडी टीव्ही आदी उत्पादनांचा समावेश आहे.

टीसीएल इंडियाचे जनरल मॅनेजर माइक चेन म्हणाले, “फ्लिपकार्टसोबत संबंध प्रस्थापित करताना आम्हाला आनंद होत आहे आणि ही भागीदारी भविष्यातही कार्यरत राहील. टीसीएलमध्ये आ म्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत, सर्वोत्कृष्ट उत्पादने तयार करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. ही उत्पादने किफायती असून गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. भारतात तयार झालेल्या इ-कॉमर्स मार्केटप्लेस-फ्लिपकार्टवर या उत्पादनांचे लाँचिंग करत आहोत. याद्वारे टीसीएलचा इ-कॉमर्स बिझनेस विस्तारल्याचे दिसून येते. भविष्यातही आमची ही भागीदारी अशीच कायम राहील.”

टीसीएल ४के टीव्ही रेंज खालीलप्रमाणे:

पी७१५ ४के युएचडी एआय टीव्ही: पी७१५ मध्ये मायक्रो डिमिंग, डायनॅमिक कलर इन्हान्समेंट, 4k अपस्केलिंग इत्यादीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे टेलिव्हिजन नव्या पद्धतीने पाहता येतो. यात हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल, एआय-इंटिग्रेटेड सिस्टिम, गूगल प्ले सर्व्हिस आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब इत्यादी प्लॅटफॉर्मकरिता ओटीटी उपलब्धता यांचा समावेश आहे. या उपकरणाला इंटिग्रेटेड बॉक्स स्पीकरसह डॉल्बी ऑडिओचे समर्थन आहे. हे एमपीथ्री, डब्ल्यूएमए, आणि एसी४ फॉरमॅटला सपोर्ट करते. ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच प्रकारात उपलब्ध असलेल्या या डिव्हाइसची किंमत अनुक्रमे २९,९९९; ३८,९९९, ४२,९९९ आणि ६४,९९९ अशी आहे.

सी७१५ ४के  क्यूएलईडी टीव्ही: सर्वात अत्याधुनिक सी७१५ क्यूएलईडी स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्ट-इन गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल असून ते व्हॉइस असिस्टंटसोबतही चांगले काम करते. अल्ट्रा एचडी टेलिव्हिजनमध्ये क्वांटम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी व्हिजन, एचडीआर १०+ आणि आयपीक्यू इंजिन असून याद्वारे पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळतो. हा टीव्ही डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस स्मार्ट ऑड़िओ प्रोसेसिंगला सपोर्ट करतो. याद्वारे अतुलनीय मनोरंजन आणि उत्कृष्ट साउंड क्वालिटी मिळते. अगदी स्लीक डिझाइन असलेला हा अँड्रॉइड टीव्ही ५० इंच, ५५ इंच आणि ६५ इंच प्रकारात अनुक्रमे ४९,९९९, ५६,९९९ आणि ८८,४९९ रुपयांत उपलब्ध आहे.

सी८१५ ४के क्यूएलईडी टीव्ही: टीसीएलचा सी८१५ क्यूएलईडी टीव्ही सीरीज अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही सी७१५ मधील उपरोक्त सर्व सुविधांसह येतो. यात हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल, क्वांटम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी व्हिजन, एचडीआर 10+ इत्यादींचा समावेश आहे. मात्र याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मोशन इस्टिमेशन/मोशन कॉम्पेन्सेशनचा समावेश असून याद्वारे व्हिडिओ ब्लर होत नाहीत व अॅक्शन-पॅक्ड कंटेंट उत्तमरित्या आणि अखंडपणे पाहता येतो. डॉल्बी अॅटमॉसशिवाय, यातील साउंड सिस्टिममध्ये इंटिग्रेडेट ऑनक्यो साउंडबार आहेत. याद्वारे प्रीमियम ऑडिओ आउटपूटसह वाढीव मनोरंजन प्रदान केले जाते. हे अत्याधुनिक उपकरण फ्लिपकार्टवर ५५ इंच, ६५ इंच आणि ७५ इंच प्रकारात अनुक्रमे ७८,४९९, १,१४,९९९ आणि १,२९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!