टीसीएलने क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी सादर केली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, 18 : भारतीय प्रेक्षकांना टीव्ही पाहण्याचा शानदार अनुभव देण्याकरिता जागतिक टीव्ही उदयोगातील अग्रगण्य कंपनी टीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल सुविधेने युक्त ८के आणि ४के क्यूएलईडी टीव्हीची नवी श्रेणी भारतीय बाजारात सादर केली आहे. टीसीएलने फ्लॅगशिप ८के क्यूएलईडी टीव्ही ७५ इंच एक्स ९१५ सोबतच ४के क्यूएलईडी टीव्ही सी८१५ आणि सी७१५ सादर केला आहे.

या नव्या उत्पादनांमध्ये कंपनीने बहुप्रतीक्षित ७५ इंच एक्स ९१५ च्या ८के क्यूएलईडी अँड्रॉइड टीव्हीमध्ये आयमॅक्स अॅडव्हान्स्ड आणि डॉल्बी व्हिजन अल्ट्रा व्हिव्हिड इमेजिंग पॉप अप कॅमेरा तसेच डॉल्बी अॅटमॉस इमर्सिव्ह ऑडिओ सादर केला आहे. अशा प्रकाराचा हा भारतातला पहिला ८के क्यूएलईडी आहे. यासह ४के क्यूएलईडी एडिशन सी ८१५ आणि सी ७१५ देखील जगातील प्रमुख क्वांटम डॉट डिस्प्ले तंत्रज्ञानासह येते. यात प्रीमियम ऑडिओ आउटपुटसाठी आयमॅक्स अॅडव्हान्स्ड, डीटीएस आणि डॉल्बी अॅटमॉस इमर्सिव्ह ऑडिओसह एक स्वतंत्र ऑनक्यो साउंडबार आहे. टीव्हीद्वारे समर्थपणे कॉलिंग करण्यासाठी ब्रँडने आपल्या ८के मॉडेलमध्ये एक बिल्ट-इन पॉप अप कॅमेरा लावला आहे. बाजारात टीसीएलच्या नव्या ८के क्यूएलईडी ७५ एक्स ९१५ ची किंमत २,९९,९९० रुपये आहे.

प्रीमियम ४के क्यूएलईडी टीव्ही, सी८१५ बिल्ट-इन सबवूफरसह ६९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. हा तीन प्रकारात येतो. ५५ इंच, (६९,९९० रुपये), ६५ इंच (९९,९९० रुपये) आणि ७५ इंच (१,४९,९९० रुपये). टीव्हीमध्ये ४के क्यूएलईडी डिस्प्ले, क्वांटम डॉट टेक्नोलॉजी, डॉल्बी व्हिजन अँड डॉल्बी अॅटमॉस, एचडीआर १०+, सहज मोशन आणि अॅक्शन सीन्स अधिक रंजक बनवण्यासाठी १२० हर्ट्ज एमईएमसी (६५ इंच आणि त्यावरील व्हर्जनमध्ये), आणि साउंड एक्सपिरिअन्स अधिक उत्तम बनवण्यासाठी ओनक्यो इंटिग्रेटेड साउंडबार, डॉल्बी अॅटमॉससह बिल्ट इन सबवूफर आहेत.

टीसीएल इंडियाचे महाव्यवस्थापक माइक चेन म्हणाले, “ या वर्षी टीव्ही लाइनअप लाँच करताना मला आनंद होत आहे. यात एक्स ९१५, सी ७१५ आणि सी ८१५ चा समावेश आहे. टीसीएलमध्ये आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने टीव्ही पाहण्याच्या अनुभवाला एक वेगळी उंची मिळवून देण्याचा प्रयत्न  करतो. आम्हाला विश्वास आहे की, विविध सुविधायुक्त हे तीन टेलिव्हजन बाजारात सकारात्मक परिणाम निर्माण करतील आणि ब्रँडला नव्या उंचीवर नेतील.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!