टीसीएल बनली फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२१ची सहयोगी प्रायोजक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । टीसीएल या जगातील अग्रणी टेलिव्हिजन उत्पादक कंपनीचा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त त्यांच्या टेलिविहजन्सच्या श्रेणीच्या माध्यमातून ग्राहकांना घरामध्येच सिनेमॅटिक अनुभव देण्याचा मनसुबा आहे. घरगुती मनोरंजन अधिक दृढ करण्याच्या ध्येयासह टीसीएलने आता मायग्लॅमफिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२१ साठी सहयोगी प्रायोजक म्हणून फिल्मफेअरसोबत सहयोग केला आहे. क्रिएटिव्ह लाईफ या आपल्या तत्त्वाशी बांधील राहत ब्रॅण्ड फिल्मफेअरसोबत सहयोगाने ओटीटी व्यासपीठावरील सर्वोत्तम प्रतिभांना सन्मानित करेल आणि मनोरंजन सर्जनशीलतेला चालना देईल.

मागील काही वर्षांमध्ये ओटीटी व्यासपीठांनी भारतीय मनोरंजन क्षेत्रावर प्रभुत्व निर्माण केले आहे. ज्यामुळे टीव्ही उत्पादकांना आधुनिक कन्टेन्ट प्रकाराशी जुळू शकणारी उत्पादने सादर करण्यावर भर द्यावा लागला आहे. टीसीएलने देखील या परिवर्तनाला ओळखले आणि ओटीटी प्रतिभांना सन्मानित करण्यासाठी फिल्मफेअरसोबत सहयोग केला आहे. फिल्मफेअर अवॉर्डसने सहा दशकांपासून चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम सिनेमॅटिकला प्रशंसित व सन्मानित केले आहे. दुस-या पर्वाच्या लाँचसह ब्रॅण्ड डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील वारसा अधिक पुढे घेऊन जात आहे.

टीसीएल इंडियाचे महा-व्यवस्थापक माइक चेन म्हणाले, “टीसीएलमध्ये आम्ही या उत्साहवर्धक व सर्जनशील उद्यमासाठी फिल्मफेअरसोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत व आम्हाला अभिमानही वाटतो. आम्ही लोकांचे जीवन सुलभ व मनोरंजनपूर्ण करणारी नवोन्मेष्कारी उत्पादने निर्माण करण्याप्रती नेहमीच काम करत आलो आहोत. तसेच फिल्मफेअर देखील अवघड काळामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अथक मेहनत घेतलेल्या ओटीटी प्रतिभांचा सन्मान करतो. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डसचे दुसरे पर्व मनोरंजनाच्या यशाला सन्मानित करेल. आम्ही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेले कलाकार व कन्टेन्टचा सन्मान करण्यास उत्सुक आहोत.”


Back to top button
Don`t copy text!