दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । मुंबई । जगातील अग्रगण्य तंत्रज्ञान प्रदाता म्हणून आपले स्थान प्रबळ करत टीसीएल या जगातील पहिल्या क्रमांकाच्या टीव्ही कॉर्पोरेशनने डॉल्बीचे आधुनिक ऑडिओ व इमेजिंग नवोन्मेष्कार असलेल्या तीन नवीन टीव्ही इनोव्हेशन्सच्या लॉन्चची घोषणा केली आहे. ब्रॅण्डने इतर प्रतिस्पर्धींच्या लक्षणीयरित्या पुढे असलेले टीव्ही इनोव्हेशन्स सादर करण्यासाठी डॉल्बी लॅबोरेटरीजसोबत सहयोग केला आहे.
सर्वोत्तम, गतीशील व प्रबळ टीव्ही-व्युईंग अनुभव देणारी तंत्रज्ञाने दाखवत टीसीएल सी८३५: १४४ हर्टझ व्हीआरआर असलेला न्यू जनरेशन मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही, सी६३५ गेमिंग क्यूएलईडी ४के टीव्ही आणि पी७३५ ४के एचडीआर गुगल टीव्ही लॉन्च करत आहे. नवीन भर करण्यात आलेले टीव्ही जगात अत्यंत किफायतशीर दरांमध्ये क्रांतिकारी टीव्ही तंत्रज्ञान सादर करण्याच्या टीसीएलच्या ध्येयाशी संलग्न आहे.
टीसीएल इंडियाचे विपणन प्रमुख विजय कुमार मिक्किलिनेनी म्हणाले, “स्थापनेपासून टीसीएलने जागतिक दर्जाची उत्पादने देण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांचे युजर्स कौतुक करतात आणि खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे. टीसीएलच्या पुरस्कार-प्राप्त पोर्टफोलिओमधील नवीन भर स्मार्ट, नवोन्मेष्कारी व अत्याधुनिक टीव्ही मॉडेल्सचे प्रतीक आहेत. आम्ही टीव्ही उद्योगामध्ये क्रांतिकारी सुधारणा घडवून आणण्यास उत्सुक आहोत आणि आमच्या समूहामध्ये अधिकाधिक ग्राहकांची भर होण्याची आशा करतो.”
आमच्या ऑल-न्यू सिरीजवर प्री-बुकिंग ऑफर देखील आहेत. १०,९९० रूपये किंमतीचा साऊंड बार आणि २,९९९ रूपये किंमतीचा व्हिडिओ कॉल कॅमेरा मोफत मिळवा. तसेच एसबीआय ग्राहकांना त्यांच्या नवीन खरेदीवर जवळपास १० टक्के कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर रिलायन्स डिजिटल आणि क्रोमामध्ये उपलब्ध आहे.
टीसीएलने प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान डॉल्बीच्या ऑडिओव्हिज्युअल टेक्नोलॉजीसोबत सहयोग केला आहे, ज्यामध्ये अल्ट्रा–विविड पिक्चर क्वॉलिटीसह अविश्वसनीय ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर व सुस्पष्टता देण्यासाठी व्यापक कलर गम्यूट क्षमतांसह हाय डायनॅमिक रेंज (एचडीआर) आहे. डॉल्बी व्हिजनसह डिस्प्ले अधिक वैविध्यपूर्ण, वास्तववादी चित्रे देतात. शार्पर कॉन्ट्रास्ट, ट्रू कलर आणि सूक्ष्म शॅडो डिटेल्सचे संयोजन अद्भुत सुस्पष्टता देते.
१४४ हर्टझ व्हीआरआर असलेला टीसीएल सी८३५ न्यू जनरेशन मिनी एलईडी ४के गुगल टीव्ही:
मिनी एलईडी ४के टीव्ही क्षेत्रामध्ये धुमाकूळ निर्माण करत टीसीएलने त्यांचा आधुनिक नवोन्मेष्कारी उत्पादन टीसीएल सी८३५ सह बेंचमार्क सादर केला आहे. अंतिम ग्राहकांच्या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन देणा-या टीसीएल सी८३५ मध्ये उच्च-स्तरीय वैशिष्ट्यांचे संयोजन आहे, जसे १४४ हर्टझ व्हीआआर, ऑनक्यो, आयमॅक्स एन्हान्स्ड, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी अॅटमॉस, एचडीआर १०+, एमईएमसी, एचडीएमआय २.१ आणि इतर अनेक. टीसीएल मिनी एलईडी ४के टीव्ही सी८३५ स्थानिक डिमिंग झोन्सचे प्रमाण वाढवत आणि लक्षवेधक कॉन्ट्रास्ट संपादित करण्यासाठी, आकर्षक सुस्पष्टता व क्यूएलईडी तंत्रज्ञानाची शक्ती असलेले एक बिलियनहून अधिक रंग दाखवण्यासाठी आकर्षक ब्राइटनेस कार्यक्षमता देत शक्तिशाली इमेजरीचा स्तर उंचावतो.
गेमिंग चाहते अधिक गेम्सचा आनंद घेऊ शकतात, जेथे टीव्हीमध्ये १२० एफपीएस सपोर्ट आहे. सी८३५ मध्ये १४४ हर्टझ व्हीआरआर, जलद प्रतिसाद, शार्पर इमेजरी व सुलभ गेमप्ले आहे. युजर्स उच्च एफपीएस गेम्सचा अनुभव घेणारे स्पर्धात्मक गेमर्स किंवा कॅज्युअल गेमर्स असो १४४ हर्ट्झ व्हीआरआर डिस्प्लेज उत्तम लाभदायी ठरू शकतात, जे युजर्सना विशेषत: मल्टीप्लेअर गेम्समध्ये लक्षणीय एज देतात.
या टीव्हीसोबत गुगल टीव्ही देखील येतो, ज्यामुळे युजर्स स्ट्रिमिंग चॅनेल्समध्ये असलेल्या शेकडो कन्टेन्ट पर्यायांचा आनंद घेऊ शकतात. ५५-इंच, ६५-इंच व ७५-इंच आकाराच्या टीसीएल सी८३५ ची किंमत अनुक्रमे ११९,९९० रूपये, १५९,९९० रूपये आणि २२९,९९० रूपये आहे.
१२० हर्टझ डीएलजी व गेम मास्टर असलेला टीसीएल सी६३५ गेमिंग क्यूएलईडी ४के टीव्ही:
वाइड कर गम्यूट, ४के एचडीआर आणि एमईएमसी (मोशन एस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन) असलेला टीसीएल सी७३५ सुलभ व्हिज्युअल्स देतो, ज्यामुळे सर्वात फास्ट-अॅक्शन चित्रपट किंवा स्पोर्टस ब्रॉडकास्ट्स अचूकपणे व सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. तसेच या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉस आहे, जे प्रिमिअम मनोरंजन अनुभव देतात, ज्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणा-या मनोरंजनाचा दीर्घकाळापर्यंत आनंद घेऊ शकता.
टीसीएल सी६३५ चे नवीन एचडीआर १०+ तंत्रज्ञान ब्राइटनेस, कलर सॅच्युरेशन व कॉन्ट्रास्टमधील फ्रेम-टू-फ्रेम बदल दाखवण्यासाठी डायनॅमिक टोन मॅपिंगचा वापर करत ४के डिस्प्लेकरिता पिक्चर क्वॉलिटी सानुकूल करते. या डिवाईसमध्ये ऑडिओ आऊटपुट अधिक लक्षवधेक करण्यासाठी ऑनक्यो साऊंड सिस्टिम आणि डॉल्बी अॅटमॉस आहे.
या विशिष्ट डिवाईसमध्ये अद्वितीय गेम मास्टर तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे गेमिंग अधिक सर्वोत्तम, सुलभ आणि वास्तववादी बनते. टीसीएल सी६३५ मध्ये शक्तिशाली प्रोसेसर देखील आहे, जे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्वात हाय-डेफिनिशन व जागतिक स्तरावर उच्च दर्जाच्या गेम्स फंक्शन कार्यरत राहण्याची खात्री देते.
टीसीएल सी६३५ ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच, ६५-इंच व ७५-इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ४४,९९० रूपये, ५४,९९० रूपये, ६४,९९० रूपये, ८५,९९० रूपये आणि १४९,९९० रूपये आहे.
टीसीएल पी७३५ ४के एचडीआर गुगल टीव्ही:
वाइड कलर गम्यूट, ४के एचडीआर आणि एमईएमसी (मोशन एस्टिमेशन, मोशन कम्पेन्सेशन) असलेला टीसीएल सी७३५ सुलभ व्हिज्युअल्स देतो, ज्यामुळे सर्वात फास्ट-अॅक्शन चित्रपट किंवा स्पोर्टस ब्रॉडकास्ट्स अचूकपणे व सुस्पष्टपणे पाहायला मिळतात. तसेच या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉस आहे, जे प्रिमिअम मनोरंजन अनुभव देतात.
टीसीएल पी७३५ मध्ये ४के, वाइड कलर गम्यूट आणि एचडीआर १० प्रोफेशनल ऑडिओहिज्युअल्स असण्यासोबत एमईएमसी मोशन पिक्चर प्रोसेसिंग आहे, जे स्पोर्ट्स व फास्ट–अॅक्शन सीक्वेन्सेससाठी सुलभ इमेजरी देते. तसेच डॉल्बी व्हिजन व डॉल्बी अॅटमॉस टीव्ही व चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांना उत्साहवर्धक व सर्वोत्तम अनुभव देतात.
टीसीएल पी७३५ मध्ये गुगल टीव्ही देखील आहे, म्हणजेच तुम्हाला स्ट्रिमिंग सेवांमधील शेकडो व हजारो कन्टेन्ट पर्याय मिळतील. टीसीएल सी६३५ ४३-इंच, ५०-इंच, ५५-इंच व ६५-इंच आकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यांची किंमत अनुक्रमे ३५,९९० रूपये, ४१,९९० रूपये, ४९,९९० रूपये आणि ६९,९९० रूपये आहे.