दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । फलटण । तावडी गावची सुकन्या कु. गीतांजली जयराम बंडगर हिने बॉक्सिंग या खेळामध्ये आपल्या गावचेच नाही तर महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. तिचे २०१९ मध्ये नॅशनल मॅच साठी पंजाब येथे निवड झाली. परंतु कोविड-19 अभावी मॅचेस रद्द झाल्या असल्यामुळे तिने सराव करणे सोडले नाही..जुलै महिन्यांमध्ये दिनांक 21 ते 24 या दरम्यान कोलकत्ता येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळवून इटली येथे आंतरराष्ट्रीय खेळासाठी तिची निवड झाली. या निवडी बद्दल गीतांजली चे मार्गदर्शक आई वडील आणि सबंध तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..संत तुकाराम महाराज यांची एक ओळ आठवते
कुळी कन्या पुत्र होते जे सात्त्विक तयाचा हारिक वाटे देवा”