स्थैर्य, अलिबाग, दि. १८: तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.
या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून मृत व्यक्तींची माहिती पुढीलप्रमाणे आहे –
निता भालचंद्र नाईक, वय ५० वर्षे, त्या उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.
सुनंदाबाई भिमनाथ घरत,वय ५५ वर्षे,ह्या उरण तालुक्यातील असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.
रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, ते पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला.
रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाकाव एमआयडीसी, रोहा
(रा.डोंबिवली, ठाणे) येथील असून त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला.
या चारही मृत व्यक्तींची नोंद घेऊन जिल्हा प्रशासनाने पुढील आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे.