
दैनिक स्थैर्य | दि. २१ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
दातेवस्ती, सस्तेवाडी, ता. फलटण येथील राजेंद्र आप्पा आडके (वय ५१) यांचा दि. २७/०१/२०२३ रोजी सकाळी ०९.०० वा ताथवडा घाट येथे मोटरसायकल डीवाईडरला धडकल्याने अपघात झाला होता. अपघातानंतर गंभीर जखमी झाल्याने आडके यांना प्रथम उपचार लाईफ लाईन हॉस्पिटल फलटण येथे केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटल, पुणे येथे दाखल होते. उपचार चालू असताना दि. १ फेब्रुवारी रोजी आडके यांचा मृत्यू झाला. रुबीचे डॉक्टर कपिल झिरपे यांनी आडके यांना मृत झाल्याचे घोषित केले. दरम्यान, राजेंद्र आडके यांच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून दि. २० फेब्रुवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.