
दैनिक स्थैर्य । दि.०४ जानेवारी २०२२ । सातारा । मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय टी आय मोळाचा ओढा, सातारा येथे दि. 10 जानेवारी 2022 रोजी मे. टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे तर्फे शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या भरती मेळाव्यास माहे डिसेंबर 2021 मध्ये परिक्षेस बसलेले अंतिम सत्राचे व्यवसाय प्रशिक्षणार्थींनी हजर रहावे ( टर्नस, फिटर, मशिनिस्ट, वेल्डर, पेन्टर, जनरल, शिट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट ग्राईंडर, टुल ॲण्ड डायमेकर, यांत्रिक मोटारगाडी तसेच इलेक्ट्रीशियनसाठी फक्त मुली) या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी ओळखपत्र, सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांचा एक झेरॉक्स संच व फोटोसह दि. 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय आय. टी. आय. मोळाचा ओढा, सातारा येथे उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस. एम. धुमाळ, उपप्राचार्य एम. एम. मांगलेकर व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लगार एम. के. उपाध्ये यांनी केले आहे.