
स्थैर्य, मुंबई, दि.२७: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस जास्तच वाढ होताना दिसत आहे. रोज 80 ते 90 हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. सुरुवातीला अचानक ओढवलेले कोरोना संकट नियंत्रणात घालण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. मात्र प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे यावरुन मोदी सरकारवर विरोधीपक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारने योग्य निर्णय घेण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. आता रोहित पवारांनीही यावरुन केंद्रावर टीका केली आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, ‘कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकाळ परिणाम असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखले जाण्याची गरज आहे. ममात्र दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिद्रे बुजवतानाच दिसत आहे. या सर्व प्रक्रियेत अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे’ असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.