तारगाव पंचक्रोशी कोरोना सावटाखाली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, रहिमतपूर, दि. ०४ (अविनाश कदम) : तारगाव तालुका कोरेगाव येथील दुर्गळवाडी येथे 22 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे तारगाव पंचक्रोशीत भितीचे वातावरण पसरले आहे , सर्वत्र कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असले तरी तारगाव पंचक्रोशीत एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढलळा नाही  परंतु काल मुंबई वरून आलेला एक  युवक पॉझिटिव्ह  आढळल्यामुळे दुर्गळवाडी तारगाव परिसर संपूर्ण सील करण्यात आलेला आहे.

याबाबत कोरेगाव च्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे यांच्या आदेशामुळे दुर्गळवाडी येथील एक किलोमीटर अंतरतील संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे,  या गावातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत ,तसेच किराणा साहित्य घरपोच ची व्यवस्था ग्राम दक्षता कमिटीने करायची  ची आहे,आशा  सक्त सूचना प्रांत यांनी दिल्या आहेत यामुळे कोरेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या दुर्गळवाडी येथील सर्व व्यवहार बंद झाले आहेत , पुढील चौदा दिवस संपूर्ण गाव बंद करण्यात आले असून जीवनावश्यक वस्तू साठी ग्रामपंचायतीच्या दक्षता कमिटी  यांच्यावरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागणार आहे.

आज अखेर तारगाव पंचक्रोशीत कोरोणाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता त्यामुळे शेती कामात गुंतलेल्या ग्रामस्थांमध्ये  निशिंत्तेचे  वातावरण होते परंतु मुंबई प्रवास करून आलेल्या एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तारगाव आणि पंचक्रोशी कोरणा रोगाच्या भीतीखाली आला आहे ,  रोग पसरू नये साठी रहीमतपुर पोलीस स्टेशनचे सपोनि घनश्यामबल्लाळ, पोलीस नाईक सचिन राठोड ,पो हे का बुजभळ ,यांनी संपूर्ण परिसर प्रतिबंधित जाहीर केला असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त आहे.  


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!