दैनिक स्थैर्य । दि. ७ मे २०२२ । आटपाडी । आटपाडी ग्रामपंचायत १५ वा वित्त योजना निधितुन आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर ५ येथे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 ते शिंदे वकील घर परिसर ते मेन रोड रस्ता करणे व पेव्हिंग ब्लॉग बसवणे या चालु असलेल्या कामाची पाहणी सांगली जिल्हा बँकेचे संचालक श्री. तानाजीराव पाटील व आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील तसेच अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲडवोकेट श्री.धनंजय पाटील यांनी केली व नागरिकांच्या इतर समस्याही जाणून घेतल्या.
तसेच उत्तम सपाटे ते मेन रोड हे बोळ रस्ता मागील १५ वर्षे बंद होता, तो बंद रस्ता चालु करुन सिमेंट कांक्रिट रस्ता व पेव्हिंग ब्लॉग बसवल्यामुळे नागरिकांनी विशेष समाधान व्यक्त केले.
यावेळी युवा नेते श्री. दत्तात्रय पाटील पंच, ग्रामपंचायत सदस्य श्री. बाळासाहेब मेटकरी, श्री. प्रकाश मरगळे, पीनू पंच माळी, श्री. शरद चव्हाण सर, सूर्यकांत राऊत, संजय हाके, अमर तावरे, अजिंक्य राऊत, आसिफ खाटीक, राजू दौंडे, श्री.मनोज देशपांडे, श्री.सचिन सपाटे, निलेश सपाटे, दस्तगीर शेख व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आमदार श्री अनिल भाऊ बाबर व श्री.तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ.वृषाली पाटील यांच्या पावने चार वर्षाच्या कार्यकाळात अनेक रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, बंदिस्त गटरीची कामे, पेव्हींग ब्लॉग बसवणे, हायमास्ट लाईट पोल लावणे अशा प्रकारची अनेक विविध विकासकामे वेगवेगळ्या भागात वरचेवर चालु असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
आटपाडी ग्रामपंचायत ला आर्थिक नीधी प्राप्त झाला त्यामुळे आत्ता सर्वच वार्ड नंबर १ ते ६ मध्ये प्रत्यक्षात २६ विकास कामे चालू झाली आहेत, तसेच सर्वच वार्ड नंबर १ ते ६ मध्ये इतर नवीन ३५ विकास कामांचे टेंडर मंजूर करण्यात आली आहेत त्यामुळे या २ दिवसात या ३५ नविन विकास कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, त्यामुळे या आठवड्यात ही नवीन ३५ विकास कामे चालू होणार आहेत. आता प्रत्यक्षात चालू असलेली 26 विकासकामे व या २ दिवसात कार्यारंभ आदेश देण्यात येणारे नवीन ३५ विकास कामे अशी एकूण तब्बल ६१ नवीन कामे या मध्ये नवीन रस्ते करणे, बंदिस्त गटर करणे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करणे अशी वेगवेगळी एकुण ६१ विकास कामे एका महिन्यात एका वेळेस चालू असण्याची आटपाडी ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
तसेच आत्ता आणखीन अर्थिक निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे उर्वरित इतर सर्वांचीच विकास कामे आपल्या सर्वांचे सहकार्याने वेळेत पुर्ण होतील, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ.वृषाली पाटील यांनी केले.
आटपाडीतील जनतेने ज्या विश्वासाने गावची जबाबदारी दिली, त्याच विश्वासाने दिलेली आश्वासने आमचे कार्यकाळात पूर्ण करु असे मतही सरपंच वृषाली पाटील यांनी व्यक्त केले.