तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता तालुका निहाय बैठका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑक्टोबर २०२२ । सातारा ।  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा परिषद, सातारा यांच्यामार्फत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात येणार असून याकरिता तालुकानिहाय बैठकांचे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी नियोजन केले आहे.

फलटण तालुक्याची बैठक मुधोजी हायस्कूल, फलटण येथे 13 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. कराड व पाटण तालुक्याची बैठक स्व.रा.कि. लाहोटी कन्या प्रशाला, कराड येथे 14 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30, माण व खटाव तालुक्याची बैठक दहिवडी कॉलेज, दहिवडी येथे 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता, वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यांची बैठक ज्ञानदिप इंग्लिश मिडीयम स्कूल, पसरणी येथे दि.18 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11.30 वाजता तर सातारा, जावली व कोरेगाव तालुक्यांची बैठक सैनिक स्कूल, सातारा येथे 19 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीसाठी महाविद्यालयातील, शाळेतील क्रीडा शिक्षक, क्रीडा विभाग प्रमुख यांनी वेळेत उपस्थित रहावे, असेही आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!