स्थैर्य, सातारा, दि. 10 : रब्बी हंगाम 2019-20 मध्ये शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत भरडधान्य (मका) खरेदीकरिता जिल्ह्यात फलटण तालुका खरेदी विक्री संघ लि. फलटण व माण तालुका खरेदी विक्री संघ लि. माण या दोन संस्थांना दि महाराष्ट्र स्टेट को. ऑप मार्केटिंग फेडरेशन यांनी मंजुरी दिलेली आहे, असे जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
खरेदी ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणावीत. या कागदपत्रांमध्ये 7/12 उतारा, रब्बी हंगाम 2019-20 मधील मका पिकाची नोंद असलेला दाखला,आधारकार्डची झेरॉक्स, आधार लिंक असलेल्या बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत.
मका खरेदीस आणताना काडी कचरा नसलेला स्वच्छ, चांगला, निवडक आणावा. शासनाने प्रस्तावीत केलेल्या एफ.ए.क्यू. स्पेशीफिकेशन प्रमाणेच खरेदी करावयाची आहे. केंद्र शासनाने हंगाम 2019-20 करीता आद्रतेचे प्रमाण मक्यासाठी 14 टक्के इतकी विहित केलेली आहे. ज्या तालुक्यात खरेदी केंद्र नाहीत अशा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर संपर्क करुन नोंदणी करावी.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे. फलटण तालुका खरेदी विक्री संघ लि. फलटण येथे विठ्ठल जाधव मो.क्र. 9923338149 व माण तालुका खरेदी विक्री संघ लि. माण येथे बळवंत चिंचकर 9822269795 यांच्याशी संपर्क साधावा.