तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांना फलटणमध्ये प्रारंभ


स्थैर्य, फलटण, दि. 2 ऑक्टोबर : येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात झाले. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भोसले, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, संस्थेचे संचालक अशोक जाधव, अजित गायकवाड, बाळासाहेब घनवट, प्राचार्य रणदेव खराडे, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ लोखंडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

खेळामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ बनते व मुलांमध्ये जय-पराजय पचवण्याची ताकद निर्माण होते, असे मत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

स्पर्धेचे पंच म्हणून काशिनाथ सोनवलकर, प्रा. घोरपडे, हिंदुराव लोखंडे, श्री. भोसले, पंकज पवार, श्री. दडस यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अशोक भोसले, मोहन रणवरे, नितीन वाघ, निलेश चिंचकर यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!