दैनिक स्थैर्य | दि. 07 सप्टेंबर 2023 | सोनवडी | फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय फलटणच्या चतुर्थ वर्षातील कृषी दूतांमार्फत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सोनवडी खुर्द येथे ‘शेतकरी दिनानिमित्त’ तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी विविध कृषी विषयक योजनांची माहिती दिली व शेती विषयक मासिकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सोनवडी खुर्द गावच्या सरपंच सौ. शालन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सचिन सूर्यवंशी, उपसरपंच शरद सोनवलकर, कृषी सहाय्यक सुनिता इंगळे मॅडम आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मंडल कृषी अधिकारी अमन सपकाळ यांनी बांबू लागवड पद्धत याविषयी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच उत्तम पद्धतीने बांबू शेती कशी करावी, याबद्दल माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकेचे निरसन केले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.
उपस्थितीत कृषीदूत केदार घनवट, शुभम कोकणे, गणेश कोळेकर, दुर्वेश बोराटे, भूषण गायकवाड, अंगद कागणे आणि शुभम आडके यांनी शेतकरी दिन कार्यक्रम राबविला.