स्थैर्य, दि.११: भारत-चीन चर्चेदरम्यान चीनकडून धमक्या दिल्या जात आहेत. सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सने लिहिले की जर भारतीय सैन्याने पँगॉन्ग त्सो लेक (लडाख) च्या दक्षिणेकडील भागातून माघार घेतली नाही तर संपूर्ण हिवाळ्यामध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए म्हणजेच चिनी सैन्य) तिथेच राहील. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर भारतीय सैन्य लवकरच आपले हत्यार खाली टाकतील.
सरकारी मीडियाची टीका इथेच थांबली नाही. भारताची सैन्य व्यवस्था कमकुवत असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच बरेच सैनिक थंडी किंवा कोरोनाने मरण पावतील असेही त्यांनी म्हटले आहे. जर भारताला शांतता हवी असेल तर दोन्ही देशांना लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (एलएसी) ची 7 नोव्हेंबर 1959 ची स्थिती मान्य करावी लागेल. जर भारताला युद्ध हवे असेल तर आम्ही त्याची इच्छा पूर्ण करू. कोणता देश कोणाला हरवू शकतो हे पाहूनच घेऊ.
‘भारत विसरलाय की, तो काय होता’
ग्लोबल टाइम्सने लिहिले, ‘चीनने नेहमीच भारताच्या सन्मान जपला आहे. आता भारतातील राष्ट्रवादी ताकद या सन्मानाचा फायदा घेऊ इच्छिते. ते विसरलेय की, ते (भारत) काय आहे? आजच्या काळात प्रत्येक गोष्ट समोर ठेवण्याची गरज आहे’
‘आमचे तिबेट सैन्य कमांड भारतकडून येणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पीएलएला पाठिंबा देण्यासाठी ड्रोनची मदत घेत आहे. हे सिद्ध करते की पीएलए कोणत्याही आव्हानांसाठी सज्ज आहे.’
राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
काँग्रेस नेता राहुल गांधींनी यांनी ट्विट केले की, ‘चीने सैन्याने आपल्या जमिनीवर कब्जा केला आहे. भारत सरकार हे वापर घेण्याची काही योजना आखत आहे की, याला ‘अॅक्ट ऑफ गॉड’ मानून सोडून देणार?’
इकडे रशियामध्ये दोन्ही देशांनी 5 मुद्द्यांवर सहमती दर्शवली
भारत-चीन वाद सोडविण्यासाठी 5 कलमी योजनेवर सहमती दर्शविली गेली आहे. गुरुवारी संध्याकाळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी मॉस्कोमध्ये चर्चा केली. त्यात म्हटले आहे की सीमावर्ती भागातील सद्य परिस्थिती कुणाच्याही हिताची नाही. दोन्ही देशांच्या जवानांनी बातचित चालू ठेवून तात्काळ डिसएंगेजमेंट (विवादित भागातून सैन्य काढून टाकणे) चालू केले पाहिजे.