एमजीद्वारे ताल सीझन२ ची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने आज ‘नया सफर, नयी ताल’ या शीर्षकासह एमजी ताल सीझन २ ची घोषणा केली. इंडी म्युझिक कलावंतांसाठी ही एक अनन्यसाधारण टॅलंट हण्ट स्पर्धा आहे. उगवत्या व नवोन्मेष्कारी कलावंतांसाठी एक धाडसी पाऊल ठरू शकेल अशा ‘ताल’चा सीझन २, एका व्यापक व्यासपीठाच्या माध्यमातून उगवती प्रतिभा सर्वांपुढे आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. देशभरातील प्रतिभावंतांचा शोध घेणारी ही स्पर्धा अनोख्या व पात्र अशा इंडी कलावंतांवर प्रसिद्धीच्या प्रकाशाचा झोत टाकण्यात मदत करणार आहे, मग ते प्रतिभावंत कोठेही राहणारे असोत.

साँगड्यूच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या एमजी ताल सीझन २ चे उद्दिष्ट आपल्या व्यासपीठाची विस्तृत व्याप्ती व संगीतातील कौशल्य यांच्या माध्यमातून उगवत्या इंडी कलावंतांना मदत करणे हेच आहे. यामुळे कलावंतांचे संगीत सर्व व्यासपीठांपर्यंत व माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात मदत होईल. रेडिओ, टीव्ही किंवा डिजिटल वाहिन्या सर्वांपर्यंत हे संगीत पोहोचू शकेल. निवडक प्रतिभावंतांना करिअरबाबत मार्गदर्शनही पुरवले जाईल. एमजी विजेत्यांना केवळ एमजीव्हर्स ग्राहकांच्या समारंभात व्यासपीठ पुरवणार नाही, तर त्यांना एनएफटींच्या निर्मितीमध्येही मदत करून प्रोत्साहन देणार आहे. एमजी ताल सीझन २ हा एक वर्ष चालणारा उपक्रम असून, यामध्ये आघाडीवर पोहोचलेल्या कलावंतांना विस्तृत एक्स्पोजर (संपर्क), आवश्यक एमिनन्स (प्रसिद्धी), फलदायी एंगेजमेंट (संपर्क) आणि महत्त्वपूर्ण एक्स्पिरियन्स (अनुभव) प्राप्त होईल. हे चार एमजी तालचे आधारस्तंभ आहेत.

नया सफर, नयी ताल या स्पर्धेत भाग घेणे सोपे आहे. तुमच्या अंगी प्रचंड प्रतिभा असेल, तर फक्त www.songdew.com/mgtaal या लिंकवर जा आणि तुमचा कॉण्टेण्ट त्यावर पोस्ट करा.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “ताल सीझन २ च्या माध्यमातून इंडी म्युझिक समुदायाशी जोडून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. एमजीमध्ये आमचे संगीतावर उत्कट प्रेम आहे. आमच्या विस्तारित परिवाराला व आमच्या ब्रॅण्डला एकत्र जोडणारा बंध संगीत हाच आहे. या नवीन सीझनमध्ये, आम्ही घेत असलेल्‍या प्रतिभेचा शोध उगवत्या कलावंतांना मदतीचा हात तसेच प्रोत्साहनाची थाप देईल असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. आम्ही स्मरणात राहण्याजोगे संगीत सातत्याने निर्माण करत राहू आणि सगळीकडील श्रोत्यांना न संपणारा आनंद व सुख देत राहू अशी आशा आम्हाला वाटते.”

साँगड्यूचे संस्थापक सुनील खन्ना म्हणाले की, “साँगड्यूमध्ये आम्ही ५५ हजार भारतीय कलावंत व बॅण्ड्सचे एक कुटुंब तयार केले आहे. आपले संगीत प्रमोट करण्यासाठी, सर्वत्र पोहोचवण्यासाठी व त्यातून उत्पन्न प्राप्त करण्यासाठी हे कलावंत आमच्या सेवांचा लाभ घेतात. भारतात संगीताचे भवितव्य उज्ज्वल आहे अशी खात्री आम्हाला वाटते आणि या प्रवाहाला वेग देण्यासाठी आम्ही अनेकविध संबंधितांसोबत सहयोग करत आहोत. गेल्या सुमारे १८ महिन्यांत, इंडी म्युझिकची लोकप्रियता व आकर्षण यांत लक्षणीय वाढ झाली आहे, या संगीताच्या लोकप्रियतेत अभूतपूर्व दराने वाढ होत आहे. म्हणूनच एमजी ताल सीझन २ च्या आगमनासाठी याहून अधिक चांगली वेळ सापडणे कठीणच होते. या उपक्रमासाठी एमजीसोबत काम करणे आमच्यासाठी खास अनुभव आहे आणि संगीतप्रेमींपर्यंत निवडक कलावंतांचे संगीत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

आपल्या ग्राहकांना रोमांचक अनुभव देण्याच्या दृष्टीने संगीताचा उपयोग करण्यासाठी, एमजी मोटरने संपूर्ण स्थापत्य संगीताभवती विकसित केले आहे. यामध्ये ब्रॅण्डची सोनिक आयडेंटिटी, शोरूम्समधील ब्रॅण्डशी जोडलेले संगीत आणि ब्रॅण्ड अँथेम यांचा समावेश होतो.


Back to top button
Don`t copy text!