
स्थैर्य, फलटण, दि. १० ऑगस्ट : फलटण तालुक्यातील टाकूबाईचीवाडी येथील सरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
या पक्षप्रवेशामुळे टाकूबाईचीवाडी आणि परिसरातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून, आगामी काळात याचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि प्रल्हाद साळुंखे-पाटील यांनी पक्षप्रवेश केलेल्या सरपंच आणि सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.