दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | गोखळी | गोखळी येथील तिरंगा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी भरवलेल्या बाजारात “भाजी घ्या, भाजी! ताजी, ताजी, भाजी! चाय गरम, चाय गरम, दहा रुपयाला भोपळा” आरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला. सदरील चिमुकल्यांच्या बाजारास ग्राहक, पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
शेतातील ताज्या पालेभाज्या, फळभाज्या इत्यादी खाद्य पदार्थांचे स्टाॅल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. या बाजारात इडली, वडा पाव, मन्चुरिअन, आप्पे, डालचा राईस आदींसह खाद्य पदार्थांचे बरोबरच शेवगा, भोपळा, कोथिंबीर, वांगी, मिरची, पावटा, करडई, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदी पालेभाज्या फळं भाज्याची दुकाने विक्रीसाठी विद्यार्थीनींनी थाटली होती.
खाऊगल्लीतील चटकदार पदार्थांवर फलटण – आसू रोडवरील प्रवाशी ग्राहकांनी चांगलाच ताव मारला. विद्यार्थ्यांना तिरंगा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापक फडतरे यांनी मार्गदर्शन केले.