फलटण तालुक्याचे नाव नव्या शिखरावर पोहचवा : खासदार रणजितसिंह


स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यामधून MPSC व स्पर्धा परीक्षांमध्ये ज्या फलटण तालुकत्यामधून विद्यार्थांनी उत्कृष्ट असे यश संपादन केले आहे व त्यांची निवड आता नुकतीच झालेली आहे, अश्यानी फलटण तालुक्याचे नाव राज्यात नव्या शिखरावर न्यावे असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील राजभवन येथील निवासस्थानी तालुक्यामधील ज्या विद्यार्थांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादित केलेले आहे अश्यांचा सत्कार समारंभ करण्यासाठी आयोजित छोटे खानी कार्यक्रमादरम्यान केले. या वेळी भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष सुशांत निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!