दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल माजी महापौर जगदीश गायकवास यांच्यावर तातडीने कारवाई करावी व यासोबतच योग्य गुरु रामदेव बाबा यांनी महिलांबद्दल जे अपशब्द वापरले आहेत, त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी फलटणच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत फलटण येथील तहसीलदार कार्यालयात सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना सातारा जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड, जिल्हा कोषाध्यक्ष दिनकर जगताप, राहुल गायकवाड, फलटण तालुकाध्यक्ष जयंतराव काकडे, सुखदेव सिंदे, सुर्यकांत कांबळे, विजयनाना काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.