शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संजिवराजेंना विधान परिषदेवर घ्या; प्राथमिक शिक्षक समितीची मागणी


स्थैर्य, फलटण : शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर घेऊन आमदार म्हणून कार्य करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समिती फलटणचे अध्यक्ष भगवंतराव कदम व सरचिटणीस गणेश तांबे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक व शिक्षिका यांनी केलेली आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी श्रीमंत संजीवराजे यांनी पहिल्यापासूनच खूप प्रयत्न केलेले  आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, क्रीडा क्षेत्रासाठी, नावीन्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला दिसून आलेला आहे.

तसेच केवळ फलटण तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयी कोणत्याही अडचणी संदर्भात अहोरात्र  त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. श्रीमंत संजीवराजे यांना शिक्षकांच्या व ग्रामीण भागातील मुलांच्या प्रश्नांची जवळून माहिती असल्यामुळे आणि त्या सोडवण्यासाठी त्यांची सातत्याने प्रयत्नशील अशी भूमिका असल्यामुळे श्रीमंत संजीवराजे यांना विधानपरिषदेवर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी संधी देण्यात यावी अशी मागणी शिक्षक समिती फलटणच्या सर्व पदाधिकारी यांनी केलेली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!