स्थैर्य, फलटण : सध्या फलटण शहरात व तालुक्यामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी फलटणचा ऐतिहासिक असलेला मुधोजी मनमोहन राजवाडा व सांगवी येथील विक्रम – विलास हा बंगला कोरोना रुग्णांवरती वेळेत उपचार करण्याकरिता कोरोना केअर सेंटर साठी घेण्यात यावा, या बाबतचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी प्रशाशनास दिलेले आहे. आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा व विक्रम विलास हा आलिशान बंगलाच ‘कोरोना केअर सेंटर’ साठी दिल्याने फलटणच्या राजघराण्यासाठी कायमच अपत्यस्थानेच प्रजाजनच आहे, अशाच प्रतिक्रीया सर्वत्र व्यक्त होत आहेत.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसाठी पंचायत समिती सदस्य व युवा नेते श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगवी ता. फलटण येथील आपला ऐतिहासिक अलिशान बंगला कोरोना केअर सेंटर म्हणून देण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान कोरोना रुग्णांसाठी आपले स्वतःचे घर देण्याची तयारी दाखविणारे श्रीमंत विश्वजितराजे व श्रीमंत रघुनाथराजे हे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी ठरले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी कोरोना सेंटरमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मुधोजी मनमोहन राजवाडा कोरोना केअर सेंटर साठी देणार आहेत. ‘विक्रम विलास’ या आपल्या बंगल्यामध्ये शंभर लोकांची व्यवस्था करु शकतो. यामधील खालचा मजला स्त्रियांसाठी व वरील मजला पुरुषांसाठी देण्यात यावा, असेही श्रीमंत रघुनाथराजे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान तालुक्यातील जनतेवरील राजघराण्याचे प्रेम श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या कृतीतून पुन्हा एकदा दिसुन आलेले आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी श्रीमंत रघुनाथराजे यांनी तालुका पिंजून काढला. तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्यक्ष जाउन कोरोना काळात ‘घाबरु नका, आम्ही पाठीशी आहोत’ असा धीर लोकांना दिला होता.
बाजार समितीच्या माध्यमातून लॉकडाउन काळात शहरात व गावोगावी फिरता दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषधोपचाराची विशेष सोय उपलब्ध करुन दिली होती. बाजार समितीतील आधिकारी, कर्मचारी, व्यापारी, आडते, हमाल यांना मोफत मास्क, स्यानिटायझरचे वाटप केले होते. लॉकडाऊन काळात अडकलेल्या परप्रांतीयांना तामिळनाडू येथे स्वखर्चाने सुरक्षितरीत्या त्यांनी बसद्वारे पाठविले होते. जनतेच्या व शेतकर्यांच्या हितासाठी फलटणचे राजघराणे हे सातत्याने प्रत्नशील राहिले आहेत.