पवार साहेब, संजीवराजेंना विधानपरिषदेवर घ्या : दत्तात्रय गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : राजकारण व समाजकारणात सक्रिय झाल्यापासून गेली २५/३० वर्षे फलटण तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी पंचायत समिती, जिल्हा परिषद, फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून शासन/प्रशासनासमोर करताना त्याची सोडवणूक करण्याला प्राधान्य दिले, त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष म्हणून या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे अधिकार प्राप्त झाल्यानंतर त्याचा उपयोगही सतत लोकांच्या हितासाठी केलेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना महाराष्ट्र विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.

प्रचंड लोकप्रियता लाभलेले बहुआयमी नेतृत्व

            

फलटण पंचायत समिती सभापती, सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून किंवा सलग २५ वर्षे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत तालुक्यातील प्रत्येकवेळी वेगळ्या मतदार संघातून मोठया मताधिक्याने विजयी झालेल्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानसभा किंवा लोकसभेवर मतदारांनी निश्चित मोठया मताधिक्याने निवडून दिले असते इतकी लोकप्रियता लाभलेल्या श्रीमंत संजीवराजे यांना ती संधी पक्षाकडे कधी मागितली नाही, अन्यथा माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या हातून गेला नसता, आजही ते स्वतः अशी मागणी करण्यास उत्सुक नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदराव पवार, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार काम करणे, ते सोपवतील ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे हीच त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट करीत आम्हा कार्यकर्त्याना श्रीमंत संजीवराजे तथा बाबा सतेच्या पदावर असावेत त्यामाध्यमातून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा असल्याने आपण ही मागणी करीत असल्याचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.

ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत एकहाती सतेचे शिल्पकार

       

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यामध्ये  ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ठेवण्याचे काम  महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष ना. जयंत पाटील, बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा. सुप्रियाताई सुळे, आ. दीपक चव्हाण, सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे.

दिवसभर लोकांसाठी कार्यरत  राहणारे कर्तृत्ववान नेतृत्व

      

गेली सलग २५/३० वर्षे सकाळी ८ वाजता आपल्या लक्ष्मीनगर येथील सरोज व्हीला या निवासस्थानी तालुक्यातून येणाऱ्या विविध समाज घटकातील लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सुमारे ११ वाजेपर्यंत सुरु असते दररोज शेकडो लोक यावेळेत त्यांना भेटून आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडत असतात मात्र तेथून कधीही कोणीही नाराज होऊन गेल्याचे ऐकिवात नाही, त्यानंतर विविध संस्थांच्या बैठका, तेथील कामकाजात भाग घेणे, त्यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती, नगर परिषद, फलटण एज्युकेशन सोसायटी, ग्रामीण भागातील अन्य सहकारी संस्था, ग्रामपंचायती, विकास सोसायट्या वगैरेंचा समावेश असतो, त्यानंतर स्वतःचे खाजगी उद्योग व्यवसाय याची पाहणी नंतर ग्रामीण भागातील कार्यक्रम, कोणाच्या लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमास, एखाद्याच्या कुटुंबातील दुःखद प्रसंगात त्यांची भेट घेणे वगैरे सकाळी ८ ते रात्री उशीरापर्यंत सतत लोकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या या नेत्याला विधान परिषदेवर कामाची संधी दिली गेल्यास त्याचे ते निश्चित सोने करतील, सर्व सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे एक प्रभावी शस्त्र त्यांच्या हाती लागल्यावरच त्यांच्या कामाची राज्यस्तरावर नोंद व्हावी यासाठी त्यांना संधी मिळावी अशी आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे माजी सभापती गुंजवटे यांनी स्पष्ट केले आहे.

विधान सभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने श्रीमंत संजीवराजे यांना विधानसभा मतदार संघामधून निवडून जाता आले नाही. वास्तविक पाहता  फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला असून त्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रीमो  खा. शरद पवार यांनी घेऊन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती  दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.

श्रीमंत संजीवराजे यांना संधी देऊन २५/३० वर्षाच्या कामाचा गौरव व्हावा

सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा बालेकिल्ला असून हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेत पक्ष वाढीसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना पक्षश्रेष्टींनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा गुंजवटे  व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

पक्ष अधिक बळकटीसाठी प्रयत्नशील नेतृत्व

श्रीमंत संजीवराजे यांचे कर्तृत्व व नेतृत्व सर्व जिल्ह्याला माहित असून अशा या कर्तृत्ववान नेतृत्वाला विधान परिषदेवर घेऊन संधी दिली तर सातारा जिल्ह्यात पक्षाची अजून चांगली बांधणी होईल. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध घटकांशी अतिशय चांगले संबंध असून या संबंधांचा फायदा सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला होईल यात कसलीही शंका नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुप्रिमो खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी श्रीमंत संजीवराजे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!