माणसांच्या चांगुलपणाची नोंद कुणीच घेत नाही.
माणसांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद कुणीच घेत नाही.
माणसांच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही.
माणसांच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही.
माणसांच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही.
परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्व घेतली जाते.
पण त्या नोंद घेणा-याला किती माहित आहे की, त्यानं किती भोगलं, सोसलं, सहन केलं आहे. हे फक्त त्याला अन् त्यालाच माहित असतं की जो त्या त्या प्रसंगाला सामोरा गेला आहे.
आपण एखाद्या प्रसंगी मत प्रकट करीत असताना दोन्ही बाजूंचा विचार करुन बोलावे. घडलं त्याची फारच चर्चा करीत बसण्यापरीस त्यातून पुढला सुयोग्य मार्ग काढणे हे भले व शहाणपणाच उत्तम लक्षण आहे.
आपलाच भांबवलेला – प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१