शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली भेट
स्थैर्य, सोलापूर, दि.31: शासकीय तंत्रनिकेतन येथे सोलापूर कारागृहातील न्यायाधीन बंदीसाठी स्वतंत्र कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमधील बंदी आणि कारागृह विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगल्या प्रकारे देखभाल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.
सोलापूर कारागृहातील 25 न्यायाधीन बंदीवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आली आहे. त्याचबरोबर कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही लागण झाली आहे. या सर्वासाठी शासकीय तंत्रनिकेतन येथील अल्पसंख्यांक समाजातील मुलीच्या शासकीय वसतिगृहात खास कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. येथे आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका पी. शिव.शंकर, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कारागृह अधीक्षक दिगंबर इगवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अभियंता संभाजी धोत्रे, महानगरपालिकेचे नगर नियोजन अभियंता महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, कारागृहातील इतर बंदीना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी 25 बंदीना स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, ‘कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. येथे आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर महानगरपालिकेतर्फे उपचार सुरु आहेत.
संतोष शेलार यांनी याच परिसरात अशा प्रकारच्या तीन इमारती आहेत. त्यामुळे त्यामध्ये दीडशे लोकांची राहण्याची व्यवस्था करण्याात येऊ शकते असे सांगितले.