महाराष्ट्राची राष्ट्रीयत्वाची परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या – तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑगस्ट २०२२ । नवी दिल्लीछत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व स्वातंत्र्यचळवळीतील महाराष्ट्राचे योगदान अनन्य साधारण असून महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा पुढे नेत भारतदेश समजून घ्या’, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी आज येथे केले.

पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आयोजित सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांच्या सत्कार समारंभात आर. एन. रवी बोलत होते. श्री. रवी म्हणालेभारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा देशभर विशेष सन्मान केला जातो. मुळात महाराष्ट्राला थोरपुरुषसमाजसुधारकस्वातंत्र्यसैनिक आदींची गौरवशाली परंपरा आहे, त्यामुळे राज्याच्या मातीतून  भारतीय प्रशासकीय सेवेत येणारे हे अधिकारी आपल्या कार्याचा ठसा उमटवितात. याचा देशाला आभिमान असल्याचेही श्री रवी म्हणाले. राज्याची हीच परंपरा पुढे घेवून जातांना प्रशासन व जनता यामध्ये उत्तम सेतू बनून कार्य करा व त्यासाठी भारतदेश समजून घ्या, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. रवी यांनी यावेळी उपस्थितांना आरोग्याची काळजीवाचन व अभ्यासवृत्ती वृद्धिंगत करणेआर्थिक स्वावलंबन  तसेच  आध्यात्मिकशक्ती  यांचा उचित समतोल राखण्याविषयीही मार्गदर्शन केले.

दिल्ली स्थित मराठी अधिकाऱ्यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या पुढचे पाऊल’ संस्थेच्यावतीने आज येथील डॉ आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे आयोजन करण्यात आले. एकूण तीन सत्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या  शेवटच्या  सत्रात राज्यपाल आर. एन. रवी  यांच्या हस्ते व लोकपाल सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डी. के. जैनपुढचे पाऊलचे संस्थापक तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळेपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव विश्वास संपकाळ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या भारतीय भूमी पत्तन प्राधिकरणाच्या सदस्य (वित्त) रेखा रायकर यांच्या उपस्थितीत सनदी सेवा उर्त्तीण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.  

गुणवंतांचा गौरव

या कार्यक्रमात संदीप शिंदेप्रशांत बाविस्कररणजित यादवओंकार शिंदेअक्षय प्रकाशकरपवन खाडे,  निरंजन सुर्वेशंतनू मलानीयश काळेअर्जित महाजनविशाल खत्रीरोहन कदमनितीश डोमळेस्वप्नील सिसलेअजिंक्य मानेअभिजित पाटीलदेवराज पाटीलशुभम भोसलेपद्मभूषण  राजगुरूगिरीष पालवे या सनदी सेवा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वीकार्यक्रमाच्या पहिल्या  सत्रात  उत्तीर्ण उमेदवारांनी  स्पर्धा परीक्षेची व अभ्यासाची तयारी या विषयी अनुभव कथन केले. तसेचकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परिक्षेविषयी तयारी  करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. दुसऱ्या सत्रात उत्तीर्ण उमेदवरांनी परीक्षार्थींना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीविषयी मार्गदर्शन केले. दिल्लीच्या विविध भागात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणारे महाराष्ट्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

पुढचे पाऊल संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचा सत्कार व मार्गदर्शन समारंभाचे हे चौथे वर्ष आहे.                                    


Back to top button
Don`t copy text!