बोंडारवाडी प्रकल्पासाठी मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करा आ. शिवेंद्रसिंहराजे; अधिकारी व ग्रामस्थ बैठकीत प्रशासनाला केल्या सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२१: जावली तालुक्यात ५४ गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. या प्रकल्पला पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ठो-राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलसंपदा विभाग आणि जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने संयुक्तपणे सकारात्मक अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावाआणि हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जावली तालुक्यात बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या दालनात आज महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी रामदास शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती चौगुले, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव धुळे, यांच्यासह मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, बबनराव बेलोशे, शाम धनावडे, अंकुश बेलोशे,ज्ञानदेव रांजणे यांच्यासह  बोंडारवाडी धरण निर्माण समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाने या प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्याला अनुसरून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक घेतली. तीनही विभागांनी तातडीने सकारात्मक अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

Back to top button
Don`t copy text!