
स्थैर्य, सातारा, दि.17 ऑक्टोबर : भारत सरकारच्या वित्तीय समावेशन विभाग अंतर्गत सुरू असलेल्या आपला पैसा आपला अधिकार ही योजना जिल्हा अग्रणी बँक, सर्व बँका व विमा कंपन्या यांच्या माध्यमातून राबवित असून आपला पैसा आपला अधिकार ही अतिशय सुंदर अशी केंद्र सरकारची संकल्पना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी
आपला पैसा आपला अधिकार महामेळाव्याचे महासैनिक भवन, करंजे येथे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. माने बोलत होते. या प्रसंगी महाप्रबंधक मनोज करे, सहा. महाप्रबंधक दीपक पाटील, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र कनीशेट्टी, बँक ऑफ महाराष्ट्राचे उपअंचल प्रबंधक महेश कुर्हेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डॉ. राजेंद्र सरकाळे, नाबार्डच्या जिल्हा विकास प्रबंधक दिपाली काटकर, आयडीबीआय बँकेचे रिजनल मँनेजर नीलेश जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नितीन तळपे, जिल्ह्यातील सर्व वित्तीय संस्थांचे पदाधिकारी बँकांचे जिल्हास्तरीय समन्वयक व दावेदार कार्यक्रमास उपस्थित होते.
संस्थांमध्ये गोरगरीब लोकांचे कोट्यावधी रुपये पडून आहेत किंबहुना सरकारी यंत्रणांची खाती सुद्धा निष्क्रिय झालेली आहेत. अशा खात्यामध्ये मोठ्या मोठ्या रकमा शिल्लक आहेत. या योजनेअंतर्गत नागरिकांनी आपले दावे सादर करून आपला असणारा पैसा आपल्या पदरी पाडून घ्यावा व ही मोहिम पुढील तीन महिने सर्व बँक शाखां व विमा कंपन्याच्या माध्यमातून राबवली जाणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असेही आवाहनही अपर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी केले.
सातारा जिल्ह्यामध्ये 108 कोटी रुपये 3 लाख 87 हजार 012 खात्यांमध्ये दावा न केलेल्या अवस्थेमध्ये पडून आहेत यामध्ये वैयक्तिक खातेदार संस्थात्मक खातेदार व शासकीय संस्था इत्यादींचा समावेश आहे तरी आज या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व ग्राहकांनी आपला दावा न केलेल्या ठेवी त्वरित आवश्यक क्लेम करून परत घ्याव्यात असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी केले. दावेदाराना अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे हस्ते 2 कोटीच्या मंजूरी पत्राचे वाटप करण्यात आले.