प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा – विजयकुमार राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । सातारा ।  नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने खरीप हंगाम 2022 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवण्यास मान्यता दिली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय, महसूल मंडळनिहाय पिके व क्षेत्र अधिसूचित केली असून त्याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या 9 पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ही योजना लागू असून या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि. 31 जुलै 2022 ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी फक्त 2 टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे  उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरण्याविषयाचे तसेच अधिक माहितीसाठी गाव पातळीवरील कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!