दैनिक स्थैर्य | दि. 09 ऑगस्ट 2024 | फलटण | राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना चालवली जाते. यामध्ये ज्यांना कोणताही आधार नाही व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये २१ हजारांच्या आतमध्ये आहे; अशा पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा फायदा होता. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण येथे संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज भरण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या लाभार्थ्यांना अर्ज भरायचा आहे; त्यांनी “अनुप शहा” यांच्या कार्यालयात संपर्क साधावा; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केले आहे.