दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा व सातारा शहराला धार्मिक आणि जातीय सलोख्याची मोठी परंपरा आहे. अशा शांतताप्रिय जिल्ह्यातील वातावरण बिघडण्याचा दुर्दैवी प्रयत्न काही संघटना व काही जण यांच्याकडून जाणिवपूर्वक होत असल्याचे लेखी निवेदन सातारचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना सातारा जिल्ह्यातील शांतता प्रेमी व सलोखा प्रेमी नागरिकांनी दिले आहे.
सातारा शहरातील मान्यवर विचारवंत , कार्यकर्ते वकील , डॉक्टर ,महिला कार्यकर्त्या , सेवानिवृत्त नागरिक , कलावंत प्राध्यापक , पत्रकार , खेळाडू, यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की सातारा जिल्ह्यात सर्व जाती- धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असतात. भारताच्या बहुविध संस्कृतीचे खऱ्या अर्थाने सातारा शहर व जिल्हा हे प्रतीक आहे. अशा शांतताप्रिय साताऱ्यात गेले काही दिवस धार्मिक मुद्द्यांवरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा दुर्दैवी प्रयत्न सातत्याने होत आहे. प्रक्षोभक कार्यक्रम आणि वक्तव्य केली जात आहेत. अशा या घटकांमुळे सातारा जिल्ह्यातील शांतता आणि सलोखा बिघडू शकते असे आम्हाला वाटते. यास्तव शांतता , जातीय व धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावेत व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की , ” अखिल भारतीय कृषी गोसेवा पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे , भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विक्रम पावसकर तसेच त्यांचे काही सहकारी हे प्रक्षोभक व समाजात द्वेष निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती या निवेदनाद्वारे आम्ही करत आहोत असे म्हटले आहे.
निवेदनावर किशोर बेडकीहाळ ,कॉ किरण माने , सुधीर पवार विजय मांडके ,जयंत उथळे , कॉ. वसंत नलावडे , बाबुराव शिंदे , प्रशांत पवार , कॉ शंकर पाटील , प्रमोद परमणे , राजीव मुळ्ये , प्रा.गौतम काटकर , पंकज काळे , रोहित ढेबे , रवींद्र भारती , कॉ त्र्यंबक ननावरे नितीन साळुंखे , दिलीप ससाणे, भरत लोकरे , गणेश दुबळे , भगवान अवघडे ,तुषार भद्रे, अतुल शहा , निवेदिता शहा , जनार्दन घाडगे , संजय म्हस्के , चंद्रहास जाधव , प्रकाश खटावकर , संग्रामजीतसिंह उधळे , नंदकुमार चोरगे , दिलिप गलांडे , प्रकाश टोपे , एडवोकेट राजेंद्र गलांडे , मिलिंद पवार, चंद्रकांत खंडाईत ,गणेश कारंडे , मच्छिंद्रनाथ जाधव , प्रा अजित साळुंखे ,अरविंद यादव ,सौ कीर्ती साळुंखे , बी एन सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या सह्या आहेत.